काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडला आहे. तरी प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा काढण्याची सवय गेलेली नाही. आता तर पाकिस्तानच्या भारतद्वेषामुळे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची चांगलीच निराशा होणार आहे. भारतीय कंपनीकडे प्रसारणाचे हक्क असल्याने पाकिस्तानने इंग्लंडविरुध्दच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण देशात होऊ द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे.The issue of Kashmir in cricket too, Pakistan will not watch funny cricket matches due to hatred of India
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडला आहे. तरी प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा काढण्याची सवय गेलेली नाही. आता तर पाकिस्तानच्या भारतद्वेषामुळे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची चांगलीच निराशा होणार आहे.
भारतीय कंपनीकडे प्रसारणाचे हक्क असल्याने पाकिस्तानने इंग्लंडविरुध्दच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण देशात होऊ द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे.पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दोऱ्यावर जाणार आहे.
तीन एक दिवसीय आणि तीन टी २० सामने खेळणार आहे. दक्षिण अशियाती प्रसारणाचे हक्क भारतीय ब्रॉडकास्टर्स कंपनी असलेल्या स्टार अॅँड एशियाकडे आहेत. मात्र, पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढत भारतीय कंपनीशी कोणताही व्यवहार करणार नसल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, भारतीय ब्रॉडकास्टर्ससोबत परवान्याचा वाद आहे. त्यामुळे इंग्लंडविरुध्दचे सामने पाकिस्तानात दाखविले जाणार नाहीत.
आम्ही कोणत्याही भारतीय कंपनीशी व्यवहार करत नाही. त्यांनी पाकिस्तान टीव्हीला प्रसारणाचे हक्क दिलेले नाहीत. त्यामुळे सामने दाखविले जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
फवाद म्हणाले, भारत सरकारने पाच ऑगस्ट रोजी निर्णय घेऊन काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतला आहे. जोपर्यंत भारत काश्मीरला हा दर्जा पुन्हा बहाल करणार नाही तोपर्यंत पाकिस्तान कोणताही व्यवहार करणार नाही.
The issue of Kashmir in cricket too, Pakistan will not watch funny cricket matches due to hatred of India
महत्त्वाच्या बातम्या