इराण सरकारने १३ वेळा केली आहे अटक, ३१ वर्षे काढली आहेत तुरुंगात
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इराणमध्ये मानवी हक्कांसाठी तसेच सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. यासाठी नर्गिस यांना २०२३ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. Nobel Prize 2023 Nobel Peace Prize to Nargis Mohammadi in Jail
नर्गिस मोहम्मदी हे त्या धाडसी महिलेचे नाव आहे, ज्यांना इराण सरकारने १३ वेळा अटक केली होती, पण त्यांचा उत्साह कमी झाला नाही, इतकेच नाही तर नर्गिस यांनी आयुष्याची ३१ वर्षे तुरुंगात काढली आहेत. शिवाय त्यांना १५४ फटक्यांची शिक्षाही झालेली आहे. जेव्हा नर्गिस मोहम्मदीला हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाही त्या तुरुंगात होत्या.
Nobel Literature Prize : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना यंदाचा साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर
नोबेल पारितोषिक समितीच्या म्हणण्यानुसार, नर्गिस मोहम्मदी यांना त्यांच्या संघर्षाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. सध्या त्या तेहरानच्या एविन तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. नर्गिस मोहम्मदी यांच्यावर इराणच्या राजवटीच्या विरोधात भ्रामक प्रचार केल्याचाही आरोप आहे.
Nobel Prize 2023 Nobel Peace Prize to Nargis Mohammadi in Jail
महत्वाच्या बातम्या
- कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!
- Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!
- विनायक ग्रुप आणि महाराष्ट्र सपा अध्यक्ष अबू आझमी यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापा
- भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!