Iran इराण ‘अणवस्त्र’ बनवणार! इस्रायलशी युद्ध सुरू असताना मोठी प्लॅनिंग

Iran

गेल्या आठवड्यात इराणने म्हटले होते की तेहरान अणुबॉम्ब बनवण्याच्या मार्गावर आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१६ जून २०२५) सांगितले की इराणची संसद अणु प्रसारबंदीअ करार (NPT) मधून बाहेर पडण्यासाठी एक विधेयक तयार करत आहे. तथापि, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई म्हणाले की आम्ही अणुशस्त्रे बनवण्याच्या बाजूने नाही.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, NPT मधून बाहेर पडण्याबाबत इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, तर एका खासदाराने सांगितले की हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

गेल्या आठवड्यात इराणने म्हटले होते की तेहरान अणुबॉम्ब बनवण्याच्या मार्गावर आहे. इराणने नेहमीच म्हटले आहे की त्यांचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण आहे. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) गेल्या आठवड्यात जाहीर केले की तेहरान त्यांच्या NPT दायित्वांचे उल्लंघन करत आहे.

NPT म्हणजे काय?

अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी) हा अण्वस्त्रे आणि संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी, अण्वस्त्रांच्या शांततापूर्ण वापरासाठी आणि इतर उद्दिष्टांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे.

इस्रायलचा इराणला इशारा

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या हल्ल्यांमुळे या प्रदेशात युद्धाची भीती वाढली आहे अशा वेळी हे पाऊल उचलले जात आहे. इस्रायलने इराणी शस्त्रास्त्र प्रतिष्ठानांजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांची ठिकाणं रिकामी करण्याचा इशारा दिला आहे.

Iran to build nuclear weapons Big planning while war with Israel is underway

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात