वृत्तसंस्था
बीजिंग : भारतात आपण लग्नासाठी नवरदेवाला हुंडा दिल्याचे प्रकार राजरोस पाहतो. पण शेजारच्या चीनमध्ये याच्या उलट घडतय. या देशातलग्नासाठी वधूला हुंडा द्यावा लागतो. चीनमध्ये वराकडून दिल्या जाणाऱ्या हुंड्याला कॅली म्हणतात. यासाठी सरकार महिलांना हुंडा न घेण्याची शपथ घ्यायला लावत आहे.In China, women have to pay a dowry, an oath not to pay the government, and the bridegroom has to pay 16 lakh rupees
चीनच्या काही प्रांतांमध्ये वराला 16 लाख 47 हजार रुपये द्यावे लागतात. अनेक ठिकाणी मुलांचे लग्न लावण्यासाठी पालक दिवाळखोर होत आहेत.
या हुंडापद्धतीला आळा घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था दैजियापूसारख्या कार्यक्रमातून प्रचार करत आहेत. काही शहरांतील अधिकाऱ्यांनीही कॅलीवर कारवाई केली आहे आणि काही वेळा वधू-वरांच्या कुटुंबीयांशी थेट बोलण्याचा प्रयत्न केला आहे.
पुरुषांच्या कमतरतेमुळे जन्माला आली प्रथा
ही प्रथा चीनमध्ये पुरुषांच्या कमतरतेमुळे आहे. हे थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुलीकडच्या मंडळींना वरपक्षाकडून हुंडा घेणार नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागत आहे. चीनमधील बहुतेक कायदे महिलांना केंद्रस्थानी ठेवून बनवले जातात. तेथे महिलांनी सामाजिक सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा केली जाते. महिलांना हुंडा न घेण्याची शपथ घ्यायला लावणारे सरकार आपल्याच एक अपत्य धोरणामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे विसरत आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की वन चाइल्ड पॉलिसीनंतर सामान्य चिनी कुटुंबातील मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
मुलांच्या लग्नासाठी पालक कर्जबाजारी
शहरी भागातील लोक याकडे पितृसत्ता म्हणून पाहतात. असे करणे म्हणजे महिलांना विकण्यासारखे आहे. सुशिक्षित जोडप्यांना पैशाशिवाय लग्न करायचे आहे. मुलांच्या लग्नामुळे पालक कर्जबाजारी होत आहेत. आयुष्यभराची कमाई लग्नात घालवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App