पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका हिंदू महिलेने निवडणुकीसाठी दाखल केला अर्ज

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास आशावादी


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानात हिंदू महिलांची काय अवस्था आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानात निवडणूक लढवण्यासाठी एका हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज भरला तर खरोखरच आश्चर्याची बाब आहे.For the first time in Pakistan a Hindu woman filed an application for election



‘डॉन’च्या रिपोर्टनुसार, पहिल्यांदाच खैबर पख्तुनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील एका हिंदू महिलेने पाकिस्तानमधील आगामी निवडणुकीत एका सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

16 व्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य निवडण्यासाठी पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. बुनेर जिल्ह्यातील PK-25 सर्वसाधारण जागेसाठी सवेरा प्रकाश यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

हिंदू समुदायातील प्रकाश या त्यांचे वडील ओम प्रकाश यांच्या पावलावर पाऊल ठेवून पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास आशावादी आहे. 35 वर्षीय प्रकाश यांचे वडील ओम प्रकाश नुकतेच निवृत्त झाले आहेत. ते डॉक्टर आणि ‘पीपीपी’चे समर्पित सदस्य आहेत.

For the first time in Pakistan a Hindu woman filed an application for election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात