नवीन चॅटिंग फीचर XChat केले लाँच; जाणू घ्या काय आहे खास?
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – Elon Musk इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि यावेळी कारण आहे त्यांनी आणलेले नवीन चॅटिंग फीचर XChat. अमेरिकेच्या राजकारणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दूरावा आल्यानंतर, मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक नवीन चॅटिंग फीचर लाँच केले आहे. Elon Musk
आता मस्क यांची नजर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मोठ्या मेसेजिंग अॅप्सवर आहे. XChat नावाचे हे नवीन फीचर युजर्सना मेसेज, व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉलची सुविधा प्रदान करेल, तेही फोन नंबरशिवाय.
XChat चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे बोलण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही मोबाइल नंबरची आवश्यकता नाही. X वर कनेक्ट केलेला कोणताही युजर्स तुमच्या संपर्क यादीत असेल आणि तुम्ही थेट चॅटिंग आणि कॉलिंग सुरू करू शकता.
मस्क यांनी हे नवीन फीचर अतिशय सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तुमचे चॅट आता पूर्णपणे खासगी असतील, कारण त्यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरले गेले आहे. म्हणजे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा तुमच्या संभाषणांमध्ये प्रवेश राहणार नाही. याचबरोबर XChat मध्ये आणखी एक खास फीचर आहे, व्हॅनिशिंग मेसेज. म्हणजेच, तुम्ही पाठवलेला मेसेज काही काळानंतर आपोआप गायब होईल. यामुळे तुमची गोपनीयता अधिक पक्की होईल. तथापि, या फीचरची संपूर्ण माहिती अद्याप उघड झालेली नाही की ते कसे काम करेल. तसेच या नवीन टूलसह, तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता, फाइल्स शेअर करू शकता आणि तेही अगदी सहजपणे.
XChat हे रस्ट नावाच्या उच्च-सुरक्षित प्रोग्रामिंग भाषेवर तयार केले आहे, जी वेग आणि सुरक्षितता दोन्हीसाठी ओळखली जाते. मस्क यांच्या टीमचा दावा आहे की त्यात बिटकॉइनसारखी एन्क्रिप्शन सिस्टम वापरली गेली आहे. XChat सध्या बीटा आवृत्तीमध्ये आहे आणि ते फक्त अशा युजर्ससाठी उपलब्ध आहे जे X चे पेड सबस्क्राइबर आहेत. जर तुमच्याही अॅपमध्ये XChat चा पर्याय दिसत असेल, तर तुम्ही 4 अंकी पिन सेट करून ते सक्रिय करू शकता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App