पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात थेट पंतप्रधान मोदींना घेरायची काँग्रेसची तयारी, राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेसच्या दलित खासदाराचाही पाठपुरावा
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणण्याबरोबरच राज्यातले फडणवीस सरकार आणि केंद्रातले मोदी सरकार यांना घेरायची तयारी काँग्रेसने केली. राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून मोदींना टार्गेट केले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या दलित खासदाराने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून महार वतनाची मूळ जमीन परत करायची आग्रही मागणी केली. त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत तापवायचा डाव खेळल्याचे स्पष्ट झाले.