पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची मे २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या टोळीवर ही हत्या केल्याचा आरोप होता. मूसेवाला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावाजवळ कारमधून जात होता आणि त्याचवेळी त्याच्या कारवर १०० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याला ३ वर्षे उलटल्यानंतर आता गोल्डी ब्रारने हल्ल्यामागील गुपित उघड केले आणि सांगितले की त्याने मूसेवालाची हत्या का केली?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ची राजकीय वीण विणण्यास सुरुवात झाली आहे. भाजप सत्तेची हॅटट्रिक करून इतिहास घडवू इच्छित आहे
गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला.
बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली.
भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी नवीन नियम आणले आहेत. आता प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही हे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी कळेल.
आता तत्काळ तिकिटांसाठी आधार आवश्यक असेल. आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाइटवर आधार पडताळणी करावी लागेल. हा नियम १ जुलैपासून लागू होईल. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पहिल्या ३० मिनिटांसाठी फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.
गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!! असला प्रकार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलाय.
कर्नाटक वाल्मिकी घोटाळ्याची चौकशी करताना ईडीने बेल्लारी येथील काँग्रेस खासदार ई. तुकाराम आणि तीन आमदारांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी फ्रँचायझी खरेदी करण्याच्या अफवांबद्दल आणि जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्टे केली आहे. ते म्हणाले की आम्हाला लोकांच्या भावना माहीत आहेत आणि आम्ही त्यांच्या जीवनाचा आदर करतो. त्यांनी विचारले की मला आरसीबीची कशासाठी गरज आहे?
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ४ जून रोजी त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) प्रदान करण्यात आले. तसेच, सोमवारी त्यांना DGMO तसेच उप-प्रमुख लष्कर प्रमुख (रणनीती) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरातील दलित आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आव्हानांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की देशातील सुमारे ९०टक्के विद्यार्थी वंचित समुदायातून येतात आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. ते म्हणजे १. निवासी वसतिगृहांची वाईट अवस्था आणि २. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये प्रचंड अनियमितता आणि विलंब.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललात “रिचर्ड निक्सन” आणि जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरत चाललाय पाय असेच ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकीय हालचालींमधून समोर आले.
ईदच्या उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणी मांसाचे तुकडे फेकल्या जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की राज्यातील हिंदूंविरुद्ध गोमांस हे शस्त्र बनवले जात आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण सिंह यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे लक्ष्मण सिंह यांना काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताविराेधातच संघर्ष करण्याची तयारी केली हाेती. मात्र, बांग्ला देशाच्या लष्करप्रमुखांनीच हा डाव उधळून लावला. सरकारवरील नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी युनूस यांनी भारतासोबत सीमेवर छोटा मोठा संघर्ष करण्याची योजना बनवली होती. त्यातून देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि लोक त्यांच्यासोबत उभे राहतील ही अपेक्षा होती. विना निवडणूक सरकार टिकवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु बांगलादेशाचे सैन्य प्रमुख वकार उज जमां यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी हा डाव उधळून लावला.
नितीश कुमार यांच्यावर over dependency म्हणजेच ज्यादा अवलंबित्व ठेवल्याने भाजपला तोटा चिराग पासवान यांनी मध्येच दामटला घोडा!! ही बिहारच्या राजकारणातल्या निवडणुकीपूर्वीची सुरुवात आहे.
Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले.
ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल जगाला सांगून परतलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली. त्यांच्यासोबत जेवण केले.
महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी एक मोठी आर्थिक झळ ठरणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मद्याच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, उत्पादन शुल्कात (Excise Duty) वाढ केली आहे. त्यामुळे आता देशी दारूपासून ते विदेशी प्रीमियम ब्रँडपर्यंत सगळ्याच मद्य प्रकारांची किंमत वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडणार असली तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.
शुभांशु शुक्ला हे फ्लोरिडा (यूएसए) येथून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) कडे रवाना झाले आहेत. त्यांच्या १४ दिवसांच्या प्रवासात ते भारतीय संशोधकांनी तयार केलेले सात महत्वपूर्ण प्रयोग करणार आहेत. हे प्रयोग दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
कर्नाटक सरकारने राज्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही जनगणना पारदर्शक आणि सर्व समाजघटकांचा समावेश असलेली असेल. या प्रक्रियेसाठी वेळापत्रक लवकरच निश्चित होईल आणि ९० दिवसांत अहवाल तयार केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगभरात पाकिस्तानाच खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता का होती, हे सांगण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली.
भारतीय लष्कराला लवकरच एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र, ड्रोन भारताच्या सीमेवरून सहज पाडले जाईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App