भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २३ वर्षांत सायप्रसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III प्रदान केले. पंतप्रधान मोदी रविवारी या भूमध्यसागरीय बेट देशात पोहोचले जिथे राष्ट्रपती निकोस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी संयुक्तपणे माध्यमांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत सायप्रसच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दलही चिंता व्यक्त केली.
केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात असे सांगण्यात आले आहे की जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल.
जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असताना आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीचे हेलकावे खात असताना इतर मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि सकारात्मक आहे, याचे प्रत्यंतर आज समोर आले.
:प्रेमाला धर्माची चौकट घालता येत नाही. दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींमध्ये प्रेम होतं, म्हणजे ते लव्ह जिहादचं नाव घेतलं जावं का? असा सवाल प्रसिद्ध अभिनेते आमिर खान याने केला .’आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर खानला लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता, त्याने स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडली.
रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेत, ३२८ शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. यामध्ये सेल्फ लोडिंग रायफल्स (SLR) आणि INSAS सारख्या रायफल्सचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रसला पोहोचले आहेत. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी रविवारी विमानतळावर लाल गालिचा अंथरूण त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष निकोस पंतप्रधान मोदींचा हात धरून चालत गेले.
ऑपरेशन सिंदूरनंतर काही आठवड्यांनंतर हवाई दलाच्या ताफ्यात एक नवीन विमान सामील होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हवाई दलाला स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान तेजस Mk 1A हे पुढील पिढीचे विमान मिळेल. उड्डाण चाचण्यांची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे लढाऊ विमान ताफ्यात सामील होईल.
अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल आणि राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तथापि, नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पुढच्या पाच वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या उलथापालथी घडून भारताची सीमा सध्याच्या पाकिस्तानच्या आतमध्ये 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, असे खळबळजनक आणि गंभीर भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी शिमला मधल्या पत्रकार परिषदेत केले. संघाच्या वरिष्ठ नेत्याने एवढे थेट भाकीत केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटलेत.
हिज्बुत-तहरीर (एचयूटी) या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कबाबत राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) चौकशी तीव्र झाली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी एनडीए सोडून एलजेपी (रामविलास) विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची आज रविवार १५ जून रोजी डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे. विजय रुपानी एअर इंडियाच्या AI171 विमानामध्ये होते, जे १२ जून रोजी दुपारी १:३९ वाजता अहमदाबादमध्ये कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. विजय रुपानी यांचाही यामध्ये समावेश आहे. अपघातात बळी पडलेले विमान एअर इंडियाचे बोईंग 787-0 ड्रीमलाइनर होते.
उपराज्यपाल सिन्हा यांनी पहलगामबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी १७ जूनपासून काही पर्यटन स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पहलगाम मार्केटचाही समावेश आहे.
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.
उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या युद्धजन्य स्थितीमुळे इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे लक्षात घेऊन भारत सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
भाजप आमदार आणि खासदारांच्या प्रशिक्षण शिबिराला आज मध्य प्रदेशातील पचमढी या हिल स्टेशनमध्ये सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचे उद्घाटन केले. त्यांनी खासदार आणि आमदारांना संबोधित केले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिराला संबोधित केल्यानंतर शहा येथून भोपाळला रवाना झाले.
इराणमधून लीक झालेल्या काही अत्यंत संवेदनशील दस्तऐवजांमुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि त्याच्या अणु कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय संशयाची सावली गडद झाली आहे. या दस्तऐवजांमध्ये दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानने १९८०–९०च्या दशकात इराणला गुप्तपणे अणु तंत्रज्ञान पुरवले. हे आरोप नव्याने समोर आले असले, तरी यामागील इतिहास आणि त्याचे आजच्या परिस्थितीवर होणारे संभाव्य परिणाम अत्यंत गंभीर आहेत.
बांगलादेशला लागून असलेल्या आसाममधील धुबरी जिल्ह्यात जातीय तणाव रोखण्यासाठी उपद्रवींना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिले आहेत. हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मंदिरात गोमांस फेकण्याची घटना कधीच घडायला नको होती. यामध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या धुबरी जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू केले जातील असे ते म्हणाले.
इजराइल आणि इराण यांच्या संघर्षात चीन पुरस्कृत शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने फक्त इजरायल वर एकतर्फी हल्लाबोल केला, पण भारताने मात्र वेळीच वेगळा सूर काढून फक्त इजरायलवर होणाऱ्या टीकेतून अंग काढून घेतले.
अहमदाबाद विमान अपघाताला सुमारे ४५ तास उलटून गेले आहेत. आठपेक्षा अधिक एजन्सी तपासात गुंतल्या आहेत. हा अपघात कसा झाला? का झाला? तांत्रिक बिघाड होता की आणखी काही? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. जगभरातील तज्ज्ञ अपघाताची कारणे शोधत आहेत. अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्याची तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात, विमानामधील नारंगी रंगाच्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स का म्हणतात?.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App