मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग: इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या रिपोर्टचे प्रकाशन केले.
देशात संविधानानुसार आरक्षण असले तरी सध्या मात्र शिक्षणातले आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले आहे.
राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थांमध्ये पीएचडी फेलोशिपसाठीची जाहिरात गेल्या अडीच वर्षांपासून प्रसिद्ध झालेली नाही.
म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!, असं म्हणायची वेळ मराठी माध्यमांनी दिलेल्या अल्प बुध्दी बातम्यांमुळे आली.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याचे नाव “बिहार का तेजस्वी प्रण” असे दिले आहे, जाहीरनाम्यात तेजस्वी यांच्या २० प्रतिज्ञांचा समावेश आहे.
पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या वादग्रस्त जमीन व्यवहाराबाबत मुंबईत धर्मादाय आयुक्तांपुढे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. जैन समाजाने या व्यवहाराची संपूर्ण चौकशी करून तो पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत धर्मादाय आयुक्तांना थेट आवाहन केले आहे की, ही जमीन जैन समाजाची आहे, आणि तिचा व्यवहार हा चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार रद्द करून न्याय द्यावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’ची घोषणा व लोगोचे अनावरण केले. त्याचबरोबर इंडियन मेरीटाईम वीक अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील आज मुंबई दौरा होत असून त्यांच्या या दौऱ्यात दोन लाख वीस हजार कोटी रुपयांच्या समुद्री प्रकल्पांची सुरुवात होणार आहे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये दुपारी 4.00 वाजता हा भव्य कार्यक्रम होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील देण्यात आला असून, याशिवाय नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या मुदती, तसेच न्यायालयीन आणि महसूल विभागाशी संबंधित मंजुरी देण्यात आली आहे. विविध विभागांमधील एकूण सात मोठ्या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व प्रशासनात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना आजपर्यंत करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची कुठलीही चौकशी नसल्याची माहिती दिली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येताच सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अशात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. निवडणूक लढवण्यासाठी नुसता इच्छुक असून उपयोग नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे किती दारूगोळा आहे याची माहिती द्यावी लागेल. निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं, असे प्रकाश सोळंके म्हणाले.
राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढवण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. तसेच जिथे जुळून येत नसेल, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढण्याचेही आदेश शिंदेंनी मंत्र्यांना दिलेत.
लावणी ते चपटी; “पवार संस्कारित” राष्ट्रवाद्यांनी केली महाराष्ट्रात सांस्कृतिक राजकीय “क्रांती”!!, असं म्हणायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्तणुकीमुळे आली.
अखेर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा बारच ठरला फुसका; पण तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला मोठा धसका!!, अशीच अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि चौकशीच्या स्कॅनर खाली… पण तिची चौकशी करणार कोण आणि तिचा अहवाल देणार कसा??, कसा याविषयी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. जागा विकत घेणारे गोखले बिल्डर्स यांनी ‘नैतिकतेच्या’ मुद्द्यावर या व्यवहारातून माघार घेत असल्याची घोषणा केली असली, तरी करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास, बोर्डिंगचे ट्रस्ट पैसे परत देण्यासाठी बांधील नाहीत. यामुळे बिल्डर विशाल गोखले यांनी दिलेले 230 कोटी रुपये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरोप – प्रत्यारोपांच्या पलीकडे विकासाची पहाट समुद्रावर उगवे!!, असे खरंच मुंबईत घडून आले. मुंबई – पुण्यातल्या जमीन खरेदी गैरव्यवहारांच्या बातम्यांनी सगळी माध्यमे भरली.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’अंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे उदघाटन आणि वितरण करण्यात आले.
मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपण्यासाठी जनतेला घरात अन् महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोलण्याचे आवाहन केले. हिंदी भारतात अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. पण मराठी आपली मातृभाषा आहे. ती आपल्याला उत्कृष्टपणे बोलता आली पाहिजे, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालायची शक्यताय. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताजा अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
एकीकडे अजितदादा म्हणाले, काम करू दर्जेदार; तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी नागपूर कार्यालयात उडविला लावणीचा बार!!, असला प्रकार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून समोर आला.
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले असून, यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मोहोळ यांनी नुकतीच जैनमुनींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, ‘माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही आणि मी हे पुराव्यानिशी वारंवार स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, हा प्रश्न काही दिवसांत संपेल,’ असे आश्वासन दिले होते. मात्र, मोहोळ यांच्या या विधानानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबई आणि पुण्यातल्या गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये बातम्या पाहिल्या तर सत्तेवर नेमके कोण आहे??, असा सवाल मनात आल्यापासून राहत नाही. कारण या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या भडीमारा मधून 2014 पूर्वीच्या राजकीय दिवसांची आठवण ढवळून वर आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App