बकरी ईदनिमित्त गायींची कत्तल होऊ नये यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने रणनीती ठरवली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर प्रमुख अमोल ठाकरे म्हणाले की, बकर ईदच्या ४८ तास आधी महाराष्ट्राच्या सीमेवर बजरंग दल चौक्या उभारेल,
डोंबिवली मधल्या एका पंधरा वर्षाच्या मुलीला ऊस लावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला तिला डांबून ठेवले आणि नंतर वेश्याव्यवसायात ढकलले. या सगळ्या प्रकरणात तब्बल 33 आरोपी असल्याचे पोलिसांना आढळून आले.
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांच्या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावे, असे एकप्रकारे आव्हानच त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना केले होते.
मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पुण्यात रविवारी शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसल्याने पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आमचे विचार वेगवेगळे असले, तरी कुटुंब म्हणून सोबत असतो. घरातील कार्यक्रमाला आम्ही एकत्र येतोच. ते आज बारामतीत माध्यमांशी बोलत होते.
एखाद्या सोसायटीत जबरदस्ती जर बकरा कापला गेला तर आमचे हिंदुत्ववादी सरकार त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही. तर हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. इथे शरीया कायदा लागू होत नाही, असा इशारा राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे असते. चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्याचं काम होते. आपले ऐतिहासिक योगदान राहिले आहे, ते यापुढे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, अजित पवार गटाने शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना परभणीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. परभणीतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील राजकीय वाद चिघळताना दिसत आहे. आता “हीच हाक्याची औकात” अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी हाकेंवर निशाणा साधत एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या घाई गर्दीत लाडकी बहीण योजना अंमलात आणून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी बहिणींना फडणवीस सरकारने पैसे वाटले पण काही लाख लाडक्या बहिणींनी सरकारला गंडवले.
नाशिक सिंहस्थ कुंभात आता ‘शाही स्नान’ ऐवजी ‘अमृत स्नान’ आयोजित केले जणार आहे. ‘शाही स्नान’ ची परंपरा ‘अमृत स्नान’ ने बदलली जाईल.
अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”; ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!, हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण खुद्द अजितदादांच्या वक्तव्याची चिकित्सा केली की त्याचे प्रत्यंतर येऊन ते पटायलाही लागेल. Ajit Pawar NCP
मराठी भाषेविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता यू-टर्न घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केले आहेत
विशेष प्रतिनिधी परभणी : शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी […]
बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते.
पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.
“लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा”, अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अहिल्यानगर येथे बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.
इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला. महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये एकाच वेळी या घडामोडी घडल्या.
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. मात्र, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मदतीच्या आश्वासनांपेक्षा वादग्रस्त विधानांनीच चर्चेत राहतात. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “या मंत्र्याचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारलाच इशारा दिला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने चालवलेल्या कारने उडवले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.
पुरोगामित्वाच्या नावाखाली संस्कृतीला शिव्या देत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच आपल्या प्रथा आणि परंपरांबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांभिक पुरोगामित्वावर हल्ला चढविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील नीलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही.
सत्तेच्या तुकड्यासाठी “पवार संस्कारितांची” तडफड; पण नको ते ऐक्य म्हणून अजितदादांच्याच दोन नेत्यांची धडपड, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मिळणारी संभाव्य संधी धूसर!!, असे राजकीय चित्र आज समोर आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App