Raj Thackeray : राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?
पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.