• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Mumbai Municipal Corporation, : मुंबई मनपात शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत; अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांचा लवकरच निर्णय

    मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Nitin Gadkari, : दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातांमध्ये 1.8 लाख मृत्यू; सरकार 10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचवण्याची योजना आणणार

    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यात सरासरी 1.8 लाख लोकांचा जीव जातो. यापैकी 66% मृत्यू तरुणांचे (18 ते 34 वर्षे) होतात.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : नगर परिषद निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकावर राहील; महसूलमंत्री बावनकुळे यांचा विश्वास

    आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचा महापौर होईल, असेही ते म्हणाले. २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसचे फारसे अस्तित्व राहणार नाही, असे मत त्यांनी मांडले.

    Read more

    Raosaheb Danve, : ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, त्यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते उरणार नाहीत, रावसाहेब दानवेंची टीका

    भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असून, यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते उरणार नाहीत, असे भाकीत दानवे यांनी वर्तवले. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारची पाठराखण करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.

    Read more

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; कारवाईसाठी CM कडे; कधीही अटक शक्य

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनामा पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

    Read more

    Valmik Karad : वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका; संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन फेटाळला; ठोस पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय

    मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यामुळे तो पुढील काळासाठीही कोठडीतच राहणार आहे. या निकालामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, गावासह संपूर्ण परिसरात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. या संवेदनशील प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले होते आणि आजचा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

    Read more

    माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा, पण पार्थच्या जमीन घोटाळ्यात नैतिकता टांगली खुंटीला!!

    माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा आली, पण पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात तीच नैतिकता त्यांनी खुंटीला टांगून ठेवली.नाशिक मधले मुख्यमंत्री कोट्यातून चार फ्लॅट लाटल्ययाप्रकरणी माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ५०००० दंड ठोठावला. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिसांनी त्या अटक वॉरंट वर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. त्यामुळे भाजपने माणिकरावांवर दबाव वाढविला. या राजकीय दबावातून त्यांना राजीनामा देणे भाग पडले. तो राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा अजितदादांनी स्वतःकडे ठेवून घेतला होता.

    Read more

    पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी – चिंचवड मध्ये घातला अडसर!!

    पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये घातला अडसर!!, अशी राजकीय परिस्थिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाजूला काढून ठेवल्यानंतर पवार काका – पुतण्यांचे पक्ष एक आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवतील, अशी शक्यता निर्माण झाली. कारण दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांवर तसा दबाव आणला आणि आघाडी करण्याचा आग्रह धरला. याला अपवाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ठरले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास नकार दिला. पण पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे बाकीचे नेते आघाडीसाठी अनुकूलच राहिले.

    Read more

    Amit shah : अमित शहा- धनंजय मुंडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; मुंडेंना मंत्री केले तर फडणवीसांना माफ करणार नाही- अंजली दमानिया

    महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकेच नव्हे, तर यात भर म्हणून आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

    Read more

    लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”; हीच २९ महापालिकांच्या निवडणुकीची खरी कहाणी!!

    लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”!!, ही राजकीय दुटप्पी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये समोर आली आहे.

    Read more

    Bajrang Sonawane, : धनंजय मुंडेंना मंत्रिपद आणि कराडला जामीन मिळणार नाही; खासदार बजरंग सोनवणेंचा टोला

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना वाल्मीक कराडला जामीन मिळणार, ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार, अशी टीका सोनवणे यांनी केली आहे

    Read more

    चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना कायदेशीर आणि राजकीय शिक्षेचा एक न्याय; मग १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला दुसरा न्याय का??

    चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना एक न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्याच्या आधी त्यांची मंत्रिपदाची खाती काढून घेतली.

    Read more

    Supreme Court, : दिल्ली प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने म्हटले– सरकारने दीर्घकालीन योजना बनवावी, राज्य सीमेवरील 9 टोल प्लाझा बंद करा

    सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात सुनावणी केली. न्यायालयाने NHAI आणि MCD ला आदेश दिले की दिल्ली सीमेवरील 9 टोल प्लाझा काही काळासाठी बंद करावेत किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवावेत.

    Read more

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

    राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला असून आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    ZP Election : ZP निवडणुकीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय; उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय राहणार अंतिम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाशी संबंधित मुद्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्याचा मोठा लाभ सत्ताधाऱ्यांना मिळण्याचा दावा केला जात आहे.

    Read more

    Maharashtra government : फडणवीस सरकारची अॅक्शन- गुटखा माफियांना चाप, उत्पादक आणि विक्रेत्यांवर लागणार थेट मोक्का!

    राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास मिळणाऱ्या गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने, आता गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षात या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.

    Read more

    महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेत AI चा वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे, महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने आरोग्य क्षेत्रात परिवर्तन आणणाऱ्या विशेष प्रकल्पाबाबत बैठक पार पडली.

    Read more

    राष्ट्रवादीतली घोटाळखोरी; सगळे “पवार संस्कारित” अमित शाहांच्या दारी!!

    एरवी कुठलेही विषय, कितीही कठीण आणि गहन असले, तरी ते शरद पवारच सोडवतात. महाराष्ट्रातल्या काय किंवा देशातल्या काय सगळ्या जगभरातल्या समस्यांची पवारांना जाण आहे. त्या सगळ्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरे पवारांकडेच आहेत, अशा डिंग्या मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक वेगळीच राजकीय मजबुरी गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये समोर आली. राष्ट्रवादीतली घोटाळखोरी आणि सगळे “पवार संस्कारित” शरद पवारांच्या नव्हे, तर अमित शाहांच्या दारी!!, हे राजकीय चित्र घेण्यात दोन-तीन दिवसांमध्ये राजधानी दिसून आले

    Read more

    महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीत १०० दिवसांमध्ये ४८ कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 100 दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती व केलेल्या घोषणांच्या पुर्ततेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्रात ४८ योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    Read more

    अजितदादांची विरोधकांकडून नव्हे, तर भाजपकडून चोहोबाजूंनी कोंडी; माणिकरावंपासून पार्थ पर्यंत उडाली दांडी!!

    अजितदादांची विरोधकांकडून नव्हे, तर भाजपकडून चोहोबाजूंनी कोंडी; माणिकरावांपासून पार्थ पर्यंत उडाली दांडी!!, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हीच राजकीय अवस्था महाराष्ट्रात दिसून राहिलीय.

    Read more

    Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची शक्यता:चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल राखीव

    पुण्याच्या लवासा सिटी प्रकल्पाला दिलेल्या कथित अवैध परवानग्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्याच वेळी, ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखाड यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. दिवाणी अधिकार क्षेत्राचा वापर करताना न्यायालय पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकते, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांना दाखवता आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती या वेळी खंडपीठाने दिली.

    Read more

    Thackeray Brothers : मुंबईत ठाकरेंची युती फिक्स, मविआ फिसकटण्याची चिन्हे; युतीसाठी 19 ‌वर्षांनंतर संजय राऊत राज ठाकरेंच्या घरी

    सुमारे ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई मनपासह ठाणे, पुणे, नाशिक, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आदी मनपात ठाकरे बंधू युती करणार हे फिक्स झाले आहे. त्यांच्यासोबत शरद पवार गटही असेल.

    Read more

    Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळा; सहदुय्यम निबंधकांमुळे बुडाला शासनाचा 21 कोटींचा महसूल

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची ४० एकर सरकारी जमीन ३०० कोटीत विकण्यात आली. जमीन विकणारी शीतल तेजवानी तसेच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना अटक केली आहे. तारूंमुळे व्यवहारात शासनाचा २१ कोटींचा महसूल बुडाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

    Read more

    मुंबईकर नागरिकांसाठी फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट; २९५ एकर जागेवर उभारणार जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क!!

    मुंबईकर नागरिकांसाठी सर्वांत मोठे गिफ्ट ठरणाऱ्या, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्क प्रकल्पाचा विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला.

    Read more

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारचा थेट सहभाग; मोठा पुरावा आला समोर!!

    पुण्यातील कोरेगाव पार्क / मुंढव्याचा शासकीय भूखंड हा शितल तेजवानी हिच्या मार्फत लाटण्यासाठीच पार्थ अजित पवार यांनी अमेडिया कंपनीची स्थापना केली असावी, असा गंभीर आरोप माहिती विजय कुंभार यांनी केला. पण त्या पलीकडे जाऊन शितल तेजवानी हिने मुंढवा जमिनीची नजराना भरण्यासाठीचं पत्र दिल्यानंतरच अमेडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर शितल तेजवानीच्या या पत्रावर पुढे कार्यवाही होत नाही म्हणून पार्थ अजित पवारने पुणे जिल्हा प्रशासनाला स्मरण पत्र दिल्याचे समोर आणले. हे पत्र विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दाखविले.

    Read more