• Download App
    NCP to Stay with NDA: Sunil Tatkare After Sunetra Pawar Meets Modi-Shah राष्ट्रवादी भविष्यातही NDA सोबतच राहणार; सुनेत्रा पवार मोदी-शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती

    Sunil Tatkare : राष्ट्रवादी भविष्यातही NDA सोबतच राहणार; सुनेत्रा पवार मोदी-शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती

    Sunil Tatkare

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Sunil Tatkare : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला पक्ष भविष्यातही केंद्रातील सत्ताधारी NDA सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तटकरेंनी ही भूमिका विषद केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दा तूर्त लोंबकळल्याचा दावा केला जात आहे.Sunil Tatkare

    अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवार गटाकडून आपली अजित पवारांशी विलीनीकरणाच्या मुद्यावर चर्चा सुरू होती असा दावा केला आहे. पण अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंसारख्या नेत्यांनी हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. अजित पवारांनी अशी एखादी चर्चा सुरू असती तर आम्हाला जरूर सांगितली असती, असा त्यांचा युक्तिवाद आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी आज सुनेत्रा पवार यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.Sunil Tatkare



    आम्ही भविष्यातही एनडीएसोबत राहू

    या भेटीनंतर सुनील तटकरे पत्रकारांशी बोलताना उपरोक्त भूमिका विषद केली. ते म्हणाले, विलीनीकरणाच्या मुद्यावर आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. कारण, आम्ही वारंवार विचारत आहोत की, विलीनीकरण कोणत्या पक्षात करायचे? दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सध्या एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी आमची भूमिका स्पष्ट केली होती. दादांच्या नेतृ्त्वात आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आमची तीच भूमिका आजही कायम आहे. आम्ही भविष्यातही एनडीएसोबतच राहू.

    एनडीएसोबत राहावे हीच अजित पवारांची इच्छा

    ते पुढे म्हणाले, एनडीएम्ध्ये येण्यासंबंधीची स्पष्टता कुणीतरी करणे आवश्यक आहे. आता विलीनीकरण किंवा काय होईल हा मुद्दा वेगळा आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता त्याच विधीमंडळ पक्षाच्या नेत्या असाव्यात अशी आमची भूमिका होती. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या सर्व बैठकांत अजित पवार आपण एनडीएसोबत जायला हवे अशी भूमिका मांडत होते. 2019 साली 3 पेक्षा दोन पक्षांनी एकत्र आल्यास राज्याचा चांगला विकास होईल असा त्यांचा विचार होता, असेही सुनील तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.

    NCP to Stay with NDA: Sunil Tatkare After Sunetra Pawar Meets Modi-Shah

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

    Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू