• Download App
    Devendra Fadnavis.ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स : कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा; नागपुरात जागतिक परिषदेचे उद्घाटन

    ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स : कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा; नागपुरात जागतिक परिषदेचे उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ या जागतिक परिषदेचे उदघाटन करण्यात आले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक स्तरावरही तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

    कोणताही आजार किंवा विकार सीमा ओळखत नाही, तो व्यक्तीची सामाजिक-आर्थिक स्थिती पाहत नाही. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे आणि सीमांच्या पलीकडे जाऊन उपाय शोधणे ही आपली जबाबदारी आहे. ही परिषद केवळ चर्चेसाठी मर्यादित नसून, व्यापक दृष्टीकोनातून विचार करण्याचे व्यासपीठ असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

    कर्करोगावर दर्जेदार उपचार

    नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारखी संस्था उभी राहिल्याने केवळ भारतातीलच नव्हे, तर विविध देशांमधील रुग्णांनाही उपचाराची सुविधा मिळत आहे. अशा अधिकाधिक संस्थांची देशाला गरज आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात ‘महा कॅन्सर फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली असून या संस्थेमार्फत संपूर्ण राज्यात ‘हब मॉडेल’च्या आधारे कॅन्सर ग्रिड उभारली जात आहे, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    कर्करोग उपचाराच्या क्षेत्रात अधिक संशोधन, नवोन्मेष, मेडटेक, बायोटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा व्यापक वापर आवश्यक आहे. विशेषतः वेळेत निदान आणि प्रारंभिक टप्प्यातच कर्करोगावर प्रभावीपणे मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग व्हावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    यावेळी एनसीआयचे अध्यक्ष सुनील मनोहर, एनसीआयचे सीईओ शैलेश जोगळेकर, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    National Cancer Institute’s ‘Oncology Beyond Borders’ Global Conference at the hands of CM Devendra Fadnavis.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातल्या नदीजोड प्रकल्पांना मोदी सरकारची गती; जलजीवन मिशनच्या योजनेलाही नवसंजीवनी!!

    भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंड कडूच!!; देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत तीव्र पडसाद!!

    Bawankule : मोदी-फडणवीसांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा; बावनकुळे यांचा सपकाळांवर पलटवार