• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 70 of 1315

    Pravin Wankhade

    SEBI Bans : बाजारात चढ-उतार घडवायची अमेरिकन कंपनी; सेबीने घातली बंदी, 4,844 कोटींची अवैध कमाई

    सेबीने अमेरिकन ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीट ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित ३ कंपन्यांवर बंदी घातली आहे. अमेरिकन ट्रेडिंग फर्मवर निर्देशांक समाप्तीच्या दिवशी किंमतींमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. सेबीने ४,८४३.५७ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

    Read more

    Mathura : मथुराची शाही ईदगाह मशीद ही वादग्रस्त रचना नाही; अलाहाबाद हायकोर्टाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली

    मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीला वादग्रस्त संरचना म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. २३ मे रोजी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.

    Read more

    Russia : रशियाचा युक्रेनवर 500 क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला; 23 जखमी; झेलेन्स्कींचा दावा- 270 क्षेपणास्त्रे पाडली

    शुक्रवारी सकाळी रशियाने युक्रेनवर ५०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला की यापैकी २७० क्षेपणास्त्रे हवेत पाडण्यात आली.

    Read more

    RBI : आता वेळेपूर्वी कर्जफेडीवर शुल्क नसणार;1 जानेवारी 2026 पासून लागू होईल RBIचा नवा नियम

    रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे. प्रत्यक्षात, RBI ने फ्लोटिंग व्याजदर असलेल्या कर्जांवरील प्री-पेमेंट शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल.

    Read more

    आगे हुसेन, पीछे हसन; बीच मे जगा मिली तो मैं भी घुसन; ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यात सुप्रिया सुळेंची अशीच एन्ट्री!!

    आगे हुसेन, पीछे हसन; बीच मे जगा मिली तो मै भी घुसन!!, अशा स्टाईलने ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची एन्ट्री घडवून आणली.

    Read more

    ऐक्याची वातावरण निर्मिती चांगली, पण ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान शिवसेना + मनसेतली गळती रोखायचे!!

    मराठीचा मुद्दा उचलून ठाकरे बंधू एकत्र येण्याची वातावरण निर्मिती तर चांगली झाली. ठाकरे बंधू या मेळाव्यात युतीची घोषणा करणार की नाही याविषयी देखील चर्चा झाली. पण काही झाले तरी युती होणे किंवा न होणे हा भविष्यातला थोडा दीर्घकालीन भाग झाला. त्याआधी ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान आहे, ते शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमधली गळती रोखायचे!!

    Read more

    DCOAS : उपसेनाप्रमुख म्हणाले- एक सीमा, तीन शत्रू; ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने आपल्याला वेपन टेस्टिंग लॅब समजले

    लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग शुक्रवारी म्हणाले- ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीमा एक होती आणि शत्रू तीन. पाकिस्तान आघाडीवर होता. त्यांच्या लष्करी उपकरणांपैकी ८१% चिनी आहेत. चीन सर्वतोपरी मदत करत होता. चीनने पाकिस्तानला शस्त्रे दिली आणि शस्त्रास्त्रांच्या चाचणीसाठी आपला प्रयोगशाळा म्हणून वापर केला.

    Read more

    Parinay Phuke : बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा; परिणय फुके यांची राज-उद्धव मेळाव्यावर टीका

    त्रिभाषा धोरणाचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर, ठाकरे गट आणि मनसेने उद्या (5 जुलै) रोजी वरळी डोम येथे संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्यावर भाजपकडून जोरदार टीका होत असून, भाजप आमदार परिणय फुके यांनी खास कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांना ताकीद; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देऊ नका!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे.

    Read more

    Ajit Pawar : महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे; उद्योजकाच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान

    गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आले मुख्यमंत्री; शरद पवारांच्या ‘जय कर्नाटक’ घोषणेची करून दिली आठवण

    पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली.

    Read more

    Eknath Shinde : ‘जय गुजरात’वर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण; उद्धव ठाकरेंनेही तसेच म्हटल्याचा व्हिडिओ दाखवला

    अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत असून जोरदार टीका केली जात असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    संघ + सेवा सहयोग उपक्रमाची 10 वर्षे : निर्मल वारी उपक्रमामुळे वारी मार्गातील गावांमधील अस्वच्छता घटली तब्बल 80 % !!

    निर्मल वारीसाठी तब्बल ३ हजार ६०० फिरते शौचालये वापरण्यात येत असून, आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात अतिरिक्त दोन हजार शौचालये बसविण्यात आली आहेत.

    Read more

    ICMR : कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास; ICMRचा दावा- लसीशी याचा संबंध नाही

    इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे की, देशात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अचानक मृत्यूंचा कोविड लसीशी थेट संबंध नाही.

    Read more

    Delhi : दिल्ली- जुन्या वाहनांसाठी ‘नो-फ्यूल’ आदेश मागे घेण्याची तयारी; मंत्री म्हणाले- प्रदूषण थांबवायला हवे

    दिल्ली सरकारने एअर क्वालिटी कमिशन (CAQM) ला पत्र लिहून जुन्या वाहनांमध्ये इंधन भरण्यावरील बंदी सध्या तरी थांबवण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी गुरुवारी दिली.

    Read more

    Ranvir Shorey : अमराठी दुकानदाराला मारहाण, राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत रणवीर शौरीचा मनसेवर संताप

    मीरा रोड परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये मराठी न बोलल्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अमराठी दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून बॉलिवूड अभिनेते रणवीर शौरी यांनी राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत मनसेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केला आहे.

    Read more

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधन पुरवठा; महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधनपुरवठा महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!, अशीच खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.

    Read more

    Amit Shah : श्रीमंत बाजीराव पेशवे स्वतःसाठी नाही तर देशासाठी लढले, अमित शहा यांचे गौरवोद्गार

    श्रीमंत बाजीराव पेशवे एक अजिंक्य योद्धा होते. आपल्या जीवनकाळात त्यांनी 41 युद्धे केली आणि एकाही युद्धात पराभव झाला नाही. ते स्वत:साठी नाही तर देश आणि स्वराज्यासाठी लढत होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.

    Read more

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- दहशतवादाविरुद्ध भारताचे झीरो टॉलरन्स; आम्ही दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देत आहोत

    भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी रात्री अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे माध्यमांना सांगितले की, भारत दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणासाठी वचनबद्ध आहे. दहशतवादी गट आणि त्यांच्या समर्थकांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे.

    Read more

    Devendra Fadnavis : इतिहासकारांचा आपल्या नायकांवर, मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अन्याय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    ब्रिटीश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील अनेक नायकांवर अन्याय . इंग्रजांनी व काही अंशी स्वकियांनीही आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच इतिहासातून डिलीट करून टाकला, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    Read more

    Kiren Rijiju : केंद्रीय मंत्र्यांनी 15 हजार फूट उंचीवर गाणे गायले; रिजिजू म्हणाले- हिमाचलमध्ये गाणे कठीण

    हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी लाहौल-स्पिती येथील १५ हजार फूट उंचीवरील कुंजम खिंडीत एका खास पद्धतीने संगीताचा आनंद घेतला. त्यांनी पार्श्वगायक मोहित चौहान आणि खासदार कंगना राणौत यांच्यासोबत एक गाणे गुणगुणले, ज्याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला.

    Read more

    British Chancellor Rachel Reeves : अर्थमंत्री रीव्हज ब्रिटिश संसदेत रडतांना दिसल्या; पौंड 1% घसरला, विरोधक म्हणाले- त्यांची खुर्ची धोक्यात

    बुधवारी ब्रिटनच्या अर्थमंत्री राहेल रीव्हज संसदेत रडल्या. त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधान कीर स्टार्मर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होत्या. रीव्हज यांच्या रडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी त्यांना कमकुवत म्हटले आणि त्यांच्यावर टीकादेखील केली.

    Read more

    India and US : अमेरिकेला पशुखाद्य विकण्यास परवानगी देऊ शकतो भारत; 9 जुलैपूर्वी व्यापार करार करण्याचा प्रयत्न

    ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारत आता अमेरिकेसोबत व्यापार करार करत असल्याने काही अनुवांशिकरित्या सुधारित पशुखाद्य आयात करण्याची परवानगी देऊ शकतो. यामध्ये सोयाबीन पेंड आणि मक्यापासून बनवलेले डिस्टिलर्स, वाळलेले धान्य यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे, जे पशुखाद्य म्हणून वापरले जातात.

    Read more

    PM Modi in Trinidad : मोदी त्रिनिदाद-टोबॅगोच्या दौऱ्यावर; 180 वर्षांपूर्वी येथे गिरमिटिया गेले होते, आता राष्ट्रपती-PMसह 40% भारतीय वंशाची लोकसंख्या

    पंतप्रधान मोदी २ जुलैपासून पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. घाना नंतर ते आज त्रिनिदाद आणि टोबॅगोला रवाना झाले आहेत, जिथे ते ३ आणि ४ जुलै रोजी राहतील. विशेष म्हणजे १९९९ नंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोला हा पहिलाच दौरा आहे.

    Read more