थलपती विजयला काँग्रेसचा पाठिंबा; अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम देखील पाठिंबा द्यायच्या तयारीत!!
तामिळनाडूत थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याबरोबर त्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी धडपड सुरू झाली.
तामिळनाडूत थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याबरोबर त्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी धडपड सुरू झाली.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे कर्मचारी 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसांच्या संपावर जाऊ शकतात. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन (AISBISF) ने आपल्या 16 मागण्यांसाठी या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत.
आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. 126 आमदारांपैकी निम्मे आमदार म्हणजेच 63 आमदार पुन्हा निवडून आले आहेत. नवीन निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी 21 (17%) आमदारांवर गुन्हेगारी आणि 19 (15%) आमदारांवर गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने हा अहवाल जारी केला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. त्या म्हणाल्या, “मी हरलेली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजभवनात जाणार नाही.”
राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत पराभवानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्यात अभूतपूर्व घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम जागांवर सर्वात वेगळा ट्रेंड बंगालमध्ये दिसला. येथे 142 मुस्लिम जागांपैकी भाजपने 72, टीएमसीने 64 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. तर, आसाममधील 22 मुस्लिम बहुल जागांवर काँग्रेसला 18, AIUDF ला 2 जागा मिळाल्या.
कर्जाच्या संकटात सापडलेल्या पाकिस्तानने सुमारे 50 वर्षांनंतर पुन्हा दारूची निर्यात सुरू केली आहे. देशातील एकमेव स्थानिक कंपनी मरी ब्रुअरीने एप्रिल 2026 मध्ये ब्रिटन, जपान, पोर्तुगाल आणि थायलंडसारख्या देशांना बिअर आणि इतर अल्कोहोलिक पेये पाठवली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प म्हणाले की, ते 8-9 वर्षांनी पद सोडतील.
जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज ( 6 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
नेपाळच्या नवीन सरकारने मोठा निर्णय घेत 1500 हून अधिक सरकारी नियुक्त्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शनिवारी अध्यादेश जारी करून 26 मार्चपूर्वीच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानमधील कराची शहरात भीषण उष्णता आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. रविवारी तापमान 40.9°C नोंदवले गेले, परंतु आर्द्रतेमुळे ते 46°C असल्यासारखे जाणवले.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय समोर आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने अचानक सर्व सरकारी कार्यालयांना फाइल्स आणि अधिकृत कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत कडक आदेश जारी केले. हा आदेश केवळ प्रशासकीय नसून त्यामागे मोठे राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे.
दक्षिण भारताच्या राजकारणात 2026 च्या निवडणुकांनी एक महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे. विशेषतः विजय यांच्या तमिझगा वेत्री कळगम (TVK)च्या यशाने केवळ तामिळनाडूपुरतेच नाही, तर शेजारच्या तेलंगणासारख्या राज्यांमध्येही नव्या राजकीय शक्यता निर्माण केल्या आहेत. या घडामोडींमुळे पारंपरिक राजकारणाच्या चौकटीला आव्हान मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी, थलपती विजय यांची INDI आघाडीत मोट बांधायचा डाव खेळला असला तरी प्रत्यक्षात राजकीय खेळी आणि चालींमध्ये आजज्ञविसंगतीच दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसवर माओवादी मुस्लिम लीगी विचारसरणी स्वीकारल्याचा आरोप केला. पण तो आरोप आता केवळ राजकीय न राहता त्याला प्रत्यक्ष आकडेवारीची जोड मिळाल्याचे निवडणुकीच्या निकालामधून उघड झाले.
केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने मोठा विजय मिळवत राज्यात पुनरागमन केले आहे. तब्बल दशकभरानंतर सत्तेत परतण्याची संधी मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र झाली आहे.
पश्चिम बंगालसारख्या परंपरेने डाव्या आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या भक्कम बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा केवळ एक अनपेक्षित राजकीय निकाल नाही.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ने राज्याच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण केला आहे. अनेक दशकांपासून विशिष्ट राजकीय पॅटर्नवर चालणाऱ्या बंगालमध्ये यावेळी मतदारांनी स्पष्टपणे ‘परिवर्तना’चा कौल दिल्याचे दिसून आले. या बदलामागे केवळ निवडणूक रणनीती नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि भावनिक पातळीवरील खोल बदल कारणीभूत असल्याचे विश्लेषणातून समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीने देशाच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण केला आहे. या निकालाचा परिणाम केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद थेट उत्तर प्रदेशमधील 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. विशेषतः अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षासाठी हा निकाल एक गंभीर राजकीय इशारा मानला जात आहे.
विजय यांच्या राजकीय यशामागे केवळ त्यांचा करिष्मा नाही, तर त्यांच्या वडिलांचा दूरदृष्टीचा ‘ब्लूप्रिंट’ही महत्त्वाचा ठरल्याची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक आणि लेखक एस. ए. चंद्रशेखर यांनी अनेक वर्षांपूर्वीच आपल्या मुलाच्या करिअरचा असा आराखडा तयार केला होता, ज्यामुळे सिनेमातून राजकारणात प्रवेश सहज झाला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.