• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 52 of 1469

    Pravin Wankhade

    Delcy Rodriguez : अमेरिकेच्या अटी मान्य केल्यानेच वाचले व्हेनेझुएलाच्या मंत्र्यांचे प्राण; कार्यकारी अध्यक्षा म्हणाल्या- 15 मिनिटांत निर्णय घ्यायचा होता

    व्हेनेझुएलाच्या कार्यकारी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, यात रॉड्रिगेज दावा करत आहेत की, अमेरिकेने तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडले, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना फक्त 15 मिनिटांचा वेळ दिला होता. त्यांना सांगण्यात आले होते की, जर त्यांनी अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील.

    Read more

    Parinay Phuke : ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी वडेट्टीवारांची अवस्था; परिणय फुके यांचा घणाघात, शरद पवारांबाबतही केले मोठे भाष्य

    काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पेचावरून भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ” चंद्रपुरात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापित करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. वडेट्टीवारांची सध्या नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था आहे,” असे परिणय फुके म्हणालेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले.

    Read more

    Sahar Sheikh : ‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा; ‘मुंब्रा हिरवा’ करण्याची केली होती वल्गना; वाद होताच पोलिसांकडे मागितली माफी

    ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात सहर शेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.

    Read more

    Imtiaz Jaleel : सहर शेखचे विधान पक्षाचीच अधिकृत भूमिका, नगरसेविकेचे इम्तियाज जलीलांकडून समर्थन, म्हणाले- पूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार

    ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सहर शेख यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून ती पक्षाचीच अधिकृत भूमिका आहे,” असे म्हणत जलील यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार,” असे ते म्हणाले.

    Read more

    Anjali Damania : भुजबळांना मिळालेल्या क्लीन चीटवर अंजली दमानियांचा संताप, हायकोर्टात जाण्याचा निर्णय

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) केसमध्येही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. “छगन भुजबळांवरील सर्व प्रकरणे संपलेली नाहीत, त्यांना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही. आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

    Read more

    Sanjay Raut : संजय राऊतांचा आजारपणावर मोठा खुलासा; कॅन्सरचे झाले निदान, स्वत: मुलाखतीत दिली माहिती

    गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर खुद्द संजय राऊत यांनीच या मौनाला पूर्णविराम दिला आहे. “मला पोटाचा कॅन्सर झाला होता,” असा धक्कादायक पण तितकाच धाडसी उलगडा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वैयक्तिक लढाईतून ते आता यशस्वीपणे बाहेर पडत असून, त्यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात पूर्ण ताकदीने एन्ट्री केली आहे.

    Read more

    Kamal Rashid Khan : गोळीबार प्रकरणात अभिनेता कमाल रशीद खान ताब्यात; ओशिवरा पोलिस ठाण्यात आणले, निवासी इमारतीवर गोळ्या झाडल्याचा आरोप

    अभिनेता कमाल रशीद खान, ज्याला केआरके म्हणूनही ओळखले जाते, त्याला मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी होता.

    Read more

    US-Iran Tensions : इराणभोवती वेगाने वाढवतोय अमेरिकी युद्धनौकांचा ताफा; इराणी नेते म्हणाले- आखातातील अमेरिकन लष्करी तळ निशाण्यावर

    अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणविरुद्ध लष्करी पर्यायांवर विचार करत आहेत.

    Read more

    मुंब्रा हिरवा करायला निघालेल्या सहर शेखच्या माफी नंतर इम्तियाज जलील यांची सगळा महाराष्ट्र हिरवा करायची धमकी!!

    एक नगरसेवक पद काय जिंकले, तर सगळा मुंब्रा हिरवा करायला निघालेल्या सहर शेखला माफी मागावी लागली, पण तिने मागितलेल्या माफी नंतर माझी खासदार इम्तियाज जलील यांना “कंठ” फुटला आणि त्यांनी सगळा महाराष्ट्र हिरवा करायची धमकी दिली.

    Read more

    अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून सुरुंग!!

    महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारमध्ये भाजपने अजित पवारांच्या वाटाल्या दिलेल्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून असा दोन्हीकडून सुरुंग लावण्यात आल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींमधून उघड झाला.

    Read more

    Mark Carney : कॅनडा PMच्या विधानामुळे ट्रम्प नाराज, गाझा पीस बोर्डचे आमंत्रण काढून घेतले, कार्नी म्हणाले होते- अमेरिकेच्या वर्चस्वाचे जग संपले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या एका विधानामुळे नाराज झाले आहेत. त्यांनी कार्नींकडून गाझा ‘बोर्ड ऑफ पीस’ मध्ये सामील होण्याचे आमंत्रण परत घेतले.

    Read more

    Pak PM : ट्रम्प यांच्या गाझा पीस बोर्डवरून पाक PM अडचणीत; विरोधक म्हणाले- ट्रम्पना खूश करण्यासाठी यात सामील झाले, हा श्रीमंतांचा क्लब

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी दावोसमध्ये अमेरिकेच्या ‘बोर्ड ऑफ पीस’च्या सनदेवर स्वाक्षरी केली आहे. हे मंडळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि पुन्हा वसवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

    Read more

    Anil Ambani : अनिल अंबानींवर ₹1.5 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली; CBI-ED कडून 10 दिवसांत सीलबंद अहवाल मागवला

    सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांच्यावर सुरू असलेल्या बँक फसवणूक प्रकरणात शुक्रवारी नवीन नोटिसा जारी केल्या आहेत. या नोटिसा न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणीनंतर जारी करण्यात आल्या आहेत.

    Read more

    Kathua Encounter : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार; अमेरिका मेड M4 रायफल जप्त

    शुक्रवारी संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांनी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर उस्मान याला ठार मारले. बिल्लावार परिसरात ही चकमक झाली. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

    Read more

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या-SIR च्या चिंतेत बंगालमध्ये रोज 4 आत्महत्या; 110 हून अधिक लोकांचा मृत्यू; निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार जबाबदार

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सांगितले की, बंगालमध्ये SIR च्या चिंतेमुळे दररोज 3 ते 4 लोक आत्महत्या करत आहेत. आतापर्यंत 110 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

    Read more

    Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटीलांचा पोलिसांना अल्टिमेटम; आठवडाभरात नावे जाहीर करा, नाहीतर मी करतो; ड्रग्स रॅकेटमुळे पोलिस दल हादरले

    अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलासाठी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेतीलच एक कर्मचारी एमडी ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. नार्कोटिक विभागाची जबाबदारी सांभाळणारा हवालदार शामसुंदर गुजर याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या खाकीचाच हात ड्रग्स रॅकेटमध्ये असल्याचं उघड झाल्याने पोलिस प्रशासनाची विश्वासार्हता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

    Read more

    बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!

    बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!, असे आज घडले. जब प्यार किया तो डरना क्या??, असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहून एक व्हिडिओ शेअर केला.

    Read more

    Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा; ACB नंतर आता EDच्या प्रकरणातही निर्दोष सुटका

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) छगन भुजबळ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. या तपासाअंती आता ईडीने छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त केले आहे.

    Read more

    शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात; 26 जानेवारी रोजी निकाल, पण जिल्हा परिषदांचा निकाल 6 फेब्रुवारी नंतर

    150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध 10 स्तरांवरील शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले आहे.

    Read more

    पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये फटका खाल्ल्यानंतर अजितदादा बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषदेत “शांततेत” प्रचार!!

    पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत करत आहेत

    Read more

    Nitesh Rane : नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली; पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत भाजपची सरशी

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच कणकवली पंचायत समितीतील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यातील वरवडे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

    Read more

    PM Modi : 18वा रोजगार मेळावा आज- पंतप्रधान 61 हजार जॉब लेटर वाटणार; देशभरातील 45 ठिकाणी आयोजन

    पंतप्रधान मोदी शनिवारी 18व्या रोजगार मेळ्यात 61 हजार नियुक्ती पत्रे वाटणार आहेत. या नियुक्त्या गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग तसेच इतर विभागांमध्ये करण्यात आल्या आहेत. रोजगार मेळ्याचे आयोजन देशभरातील 45 ठिकाणी केले जाईल.

    Read more

    Radhakrishna Vikhe Patil : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- आता धरणांच्या पाण्यावर तयार होणार वीज!, राज्यात ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारणार

    राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांच्या जलाशयांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या धरणांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प (फ्लोटिंग सोलर) उभारून महाराष्ट्राला हरित ऊर्जेत आघाडीवर आणण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

    Read more

    Rishikant Singh : मणिपूरच्या चुराचांदपूर काकचिंग खुनौ येथे ऋषिकांतच्या हत्येने असंतोष; तरुणाला न्याय मिळावा म्हणून मैतेई महिला रस्त्यावर; 72 तासांची मुदत

    मणिपुरातील कुकीबहुल क्षेत्र चुराचांदपूरमध्ये मैतेई तरुण मयांगलंबम ऋषिकांत सिंह यांच्या हत्येपूर्वी दावा केला जात होता की मणिपूरमध्ये हळूहळू शांतता नांदेल. परंतु ऋषिकांतच्या हत्येने हे उघड झाले. या मुद्द्यावर मैतेई समुदायात फूट पडली आहे. काहींचे म्हणणे आहे की ही घटना काही अतिरेकी संघटनांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी घडवून आणली आहे, तर काहींचे म्हणणे आहे की हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये कधीही शांतता नव्हती, अन्यथा अशी घटना घडली नसती.

    Read more

    Dhar Bhojshala : एमपीतील भोजशाळेत नमाज-पूजा एकाच वेळी झाली, एकीकडे हवन अन् दुसरीकडे नमाज पठण; पोलिस बंदोबस्तात वसंत पंचमी साजरी

    वसंत पंचमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेत देवी सरस्वतीची पूजा आणि शुक्रवारची नमाज एकाच वेळी करण्यात आली. हिंदू समुदायाने शुक्रवारी सकाळी ६ वाजता सूर्योदयाच्या वेळी सरस्वती पूजा सुरू केली, जी सूर्यास्तापर्यंत सुरू राहिली. दरम्यान, मुस्लिम समुदायाने भोजशाळेच्या संकुलात दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत नमाज अदा केली.

    Read more