• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 53 of 1499

    Pravin Wankhade

    Nagpur SBL : नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण; मृतांचा आकडा 18 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा

    नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

    Read more

    Jai Pawar : व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपले; जय पवारांकडून धक्कादायक दावा

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय अजित पवार यांनी एक भावनिक आणि संतप्त पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे, असे म्हणत त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत असल्याचा दावा केला आहे. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; कृषी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांकडूनही ‘क्लीन चिट’; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. 2024 मधील कृषी विभागाच्या खरेदी-विक्री व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मध्येच मुंडे यांना क्लीन चिट दिली होती. या कोणत्याही व्यवहारांमध्ये धनंजय मुंडे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना या आरोपातून मुक्त केले होते.

    Read more

    Tarapur MIDC : पालघरच्या तारापूर एमआयडीसीत वायू गळती; हवेत पसरले लोट, नागरिकांमध्ये घबराट; साठवणूक टँकमधून ओलियमची गॅस लिक

    पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील ‘डी-झोन’ भागात असलेल्या भघेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनित केमिकल्स) या कंपनीत आज दुपारी 2 च्या सुमारास भीषण वायू गळतीची घटना घडली. ओलियम वायूची ही गळती इतकी तीव्र होती की, तिचे पडसाद सुमारे दीड किलोमीटर परिसरापर्यंत उमटले आहेत. या वायू गळतीमुळे परिसरातील कामगार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ अशा शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा; महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावं समोर येण्याची शक्यता

    परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेली होती. त्या दिवसापासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले गेले; मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा ठाम आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत असून तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

    Read more

    MVA Rajya Sabha : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआतील तिन्ही पक्षांची दावेदारी:दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीही आग्रही

    महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार निवृत्त होत असल्याने ही जागा आपल्याकडेच राहावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आग्रह आहे

    Read more

    Russian Crude Oil : भारत पुन्हा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवणार; 95 लाख बॅरल तेल टँकरवर नजर

    मध्य पूर्वेत इराण-इस्रायल यांच्यातील युद्ध आणि तेलाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानंतर भारताने पुन्हा एकदा रशियाकडे मोर्चा वळवला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याचा विचार करत आहे.

    Read more

    Iran war : इराण युद्ध: 48 नेते, 40 कमांडर, 9 नौदल जहाजे… 48 तासांच्या युद्धात इराणचे प्रचंड नुकसान

    मध्यपूर्वेतील तणावाने आता उघड युद्धाचे रूप घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त लष्करी कारवाई करत इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई आणि सागरी हल्ले चढवले. या कारवाईत ईरानचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि कमांडर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही नौदल जहाजेही नष्ट झाल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Read more

    तीन विमाने नष्ट झाली तरी अमेरिकेची इराणविरुद्धची मोहीम न नाही थांबणार; अमेरिकन लष्कर प्रमुखांचा इशारा

    इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेची तीन एफ 15 विमाने नष्ट झाली, म्हणून इराण विरुद्धची मोहीम थांबणार नाही. ही मोहीम जशीच्या तशी नियोजित वेळेनुसारच सुरू राहील. त्यात कुठलाही अडथळा येणार नाही, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे लष्कर प्रमुख जॉईन्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल डॅन रायझिंग कॅन यांनी दिला

    Read more

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश‌ चेन्निथला यांचा उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट!!

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट केला. ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज घडली. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या राज्यसभा जागेवर आपला अधिकार सांगितला. त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर दिली. पण त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मनसूबा काँग्रेसने परस्पर उधळून लावला.

    Read more

    Grok AI : AIने आधीच सांगितली होती इराणवर हल्ल्याची तारीख, Elon Musk यांनीही सांगितली ही बाब

    जगभरातील सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की एलोन मस्कच्या ग्रोकने काही दिवस आधीच इराणवर अमेरिका आणि इस्रायली हल्ल्याची तारीख जाहीर केली होती. जेरुसलेम पोस्टने याबद्दल माहिती आधीच शेअर केली आहे आणि एलोन मस्कनेही त्याला उत्तर दिले आहे.

    Read more

    इराणचे युवराज रेझा पहलीशवी कोणत्याही क्षणी इराण मध्ये जायला तयार; इस्लामिक राजवट बदलायची नांदी!!

    अमेरिका आणि इजरायल यांनी इराणवर हल्ला करून इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपविल्यानंतर तिथे इस्लामिक राजवट बदलायची नांदी झाली

    Read more

    भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबरच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख सहभाग

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या भाजपने सुरू केलेल्या परिवर्तन यात्रेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले

    Read more

    US Military : इराणवरील हल्ल्यात अँथ्रोपिक AIचा वापर; लक्ष्य ओळखण्यात मदत घेतली; व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना पकडण्यातही याच टूलची भूमिका होती

    अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात त्याच AI कंपनी एन्थ्रोपिकच्या साधनांचा वापर केला आहे, ज्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी बंदी घातली होती. अमेरिकन मीडिया हाऊस द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी याची पुष्टी केली आहे.

    Read more

    NATO : इराणवरील हल्ल्यामुळे ट्रम्प पडले एकाकी, नाटो देशांनी राखले अंतर; इतिहासात पहिल्यांदाच इराण-इराक अमेरिकेविरुद्ध एकत्र

    इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर नाटो देश अमेरिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत असल्याचे दिसून येते. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनसारख्या प्रमुख नाटो देशांनी या हल्ल्यापासून स्वतःला दूर ठेवले. स्पेन व नॉर्वेनेही या कारवाईच्या वैधतेवर आक्षेप घेतला. तथापि, कॅनडा व ऑस्ट्रेलियाने पाठिंबा व्यक्त केला. इतिहासात प्रथमच इराण आणि इराक यांनी अमेरिकेविरुद्ध एकत्र आले आहेत.

    Read more

    Afghanistan : अफगाणिस्तानचा पाकिस्तानच्या नूरखान एअरबेसवर हल्ला; तालिबानचे मंत्री म्हणाले- आम्ही ड्युरंड लाइन ओलांडली

    अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर गेल्या चार दिवसांपासून हवाई हल्ले आणि गोळीबार सुरू आहे. तालिबान सरकारने म्हटले आहे की त्यांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानच्या अत्यंत संवेदनशील नूर खानवर हल्ला केला आहे.

    Read more

    राज्यसभेसाठी “एकमेव” शरद पवार म्हणणाऱ्या संजय राऊतांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत करावे लागले उभे!!

    महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी “एकमेव” उमेदवार शरद पवार असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांना अखेर त्यांना इतर उमेदवारांच्या स्पर्धेत आज उभे करावे लागले.

    Read more

    Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; महसूल सेवा आता घरापर्यंत, शिबिरांतून 15 प्रमुख सेवांचा लाभ मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

    राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली.

    Read more

    Yogesh Kadam : घुसखोरांविरुद्ध राज्य सरकारची ‘झीरो टॉलरन्स’ मोहीम; एकाच वर्षात 2376 बांगलादेशी हद्दपार

    विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना (कामकाज क्र. ४) अंतर्गत मा. प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील व्यावसायिक अवैध बांगलादेशी घुसखोरीच्या वाढत्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या विषयावर शून्यसहिष्णुतेची भूमिका घेत आक्रमक कारवाई सुरू केली आहे.

    Read more

    Amit Shah : राज्यसभेच्या सातही जागांवर उमेदवार द्या:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सूचना; महायुतीकडून अतिरिक्त 20 मतांची जुळवाजुळव सुरू

    भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सर्व 7 जागांसाठी महायुतीचे उमेदवार उतरवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी अतिरिक्त 20 मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परिणामी, विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या हाती 7 पैकी एकही जागा न लागण्याची शक्यता आहे.

    Read more

    Navnath Ban : राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयात नाक खुपसू नये! मोदींचे नेतृत्व सक्षम, संजय राऊत काँग्रेसचे दलाल, नवनाथ बन यांची टीका

    युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बसलेले आहेत, संजय राऊत यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाईल अशी वक्तव्य तुम्ही करु नका, भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सक्षम आणि समर्थपणे पुढे जात आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घातपात; विजय वडेट्टीवार यांचा दावा; AAIB च्या अहवालावर प्रश्नचिन्ह

    काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने सादर केलेल्या अहवालावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एएआयबी अजित पवारांचे विमान झाडाला धडकून खाली कोसळले अशी तकलादू थेअरी देत असेल, तर त्यामुळे अजितदादांचा घातपात झाला हे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.

    Read more

    Rupali Chakankar : कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का? राज्यातील सर्व कार्यालयांचे होणार ‘विशेष ऑडिट’, 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

    राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘पॉश’ (PoSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या अंतर्गत समितीचे (Internal Committee – IC) ‘विशेष ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून, ३० दिवसांच्या आत ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

    Read more

    Maharashtra : युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘उमरा’ यात्रेकरू संकटात; महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लिम भाविक सौदीत अडकल्याची भीती

    रमजानच्या पवित्र महिन्यात ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, हे भाविक तेथे अडकल्याची दाट शक्यता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सर्व यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

    Read more

    Nagpur SBL : नागपूरलगतच्या SBL कंपनीत स्फोट; 17 ठार, 18 जखमी; दारुगोळा तयार करताना घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

    नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

    Read more