• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 431 of 1549

    wankhadepravin

    Naib Singh Saini हरियाणा बोर्ड पेपर लीक प्रकरणात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची कठोर कारवाई

    हरियाणा बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी Naib Singh Saini यांनी कठोर कारवाई केली आहे.

    Read more

    Fadnavis महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल – मुख्यमंत्री फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ’35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा – 2025′ समारोप समारंभ पार पडला. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    Read more

    Devendra Fadnavis महिलांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट अधिक सक्षमतेने कार्यान्वित केली जाणार – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025’ संपन्न झाली. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डिपार्टमेंटल एन्क्वायरी’ या माहिती पुस्तिकेचे आणि पोलीस नियमावलीच्या दोन खंडांचे प्रकाशन करण्यात आले.

    Read more

    Rabi season : रब्बी हंगामासाठी केंद्राने ३१ दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले

    सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ च्या रब्बी विपणन हंगामासाठी ३१ दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कृषी मंत्रालयाने २०२४-२५ या पीक वर्षात ११५ दशलक्ष टन गहू उत्पादनाचे विक्रमी लक्ष्य ठेवले आहे.

    Read more

    Volodymyr Zelenskyy एकट्या युरोपच्या बळावर युक्रेनचे झेलन्स्की किती उड्या मारतील रशियावर??

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिस मध्ये झालेल्या खडाजंगी नंतर युरोप मधले राष्ट्रप्रमुख “खुश” होऊन झेलेन्स्की यांना तोंडी पाठिंबा देऊन मोकळे झाले.

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर पोलिसांनी पहिल्यांदाच WhatsAppद्वारे e-FIR नोंदवला!

    साधारणपणे तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जावे लागते, पण जर तुम्हाला सांगितले गेले की आता तुम्ही घरी बसून तक्रार दाखल करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे, आता जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या दिशेने एक पाऊल उचलले आहे आणि पहिला ई-एफआयआर नोंदवला गेला आहे.

    Read more

    Zelensky : अमेरिका झेलेन्स्कींवर नाराज, आता लष्करी मदतही रोखली!

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील बैठकीत घडलेल्या वादविवादाचा परिणाम आता दिसून येत आहे

    Read more

    Karnataka : कर्नाटकचा मुख्यमंत्री लवकरच बदलणार? भाजप नेत्याचा डीके शिवकुमार बाबात मोठा दावा!

    कर्नाटकच्या राजकारणात सध्या गोंधळ सुरू आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात सर्व काही ठीक नाही. या सगळ्यात भाजप नेत्याने एक मोठा दावा केला आहे.

    Read more

    Tejashwi Yadav : लालू, राबडी अन् तेजस्वी यादव यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे!

    लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार आहेत. लालूंसोबत त्यांचे कुटुंबही सीबीआयच्या कचाट्यात आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील अनियमिततेशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतरांवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सीबीआयने शुक्रवारी दिल्लीच्या एका न्यायालयात सांगितले.

    Read more

    तामिळनाडूतली लोकसभा मतदारसंघ संख्या घटण्याची खोटी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली; भाजपचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार!!

    तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या त्रिभाषीय शैक्षणिक धोरणाविरुद्ध तामिळनाडूमध्ये रान पेटवले असताना भाजपचे तिथले प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

    Read more

    Swami Avadheshanand Giri : स्वामी अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले- अर्धा भारत कुंभमेळ्याला आला; जगाने आपली एकता पाहिली

    जुना आखाड्याचे प्रमुख आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रवचन देण्यासाठी आले. ते म्हणाले – भारतातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या कुंभमेळ्याला पोहोचली. सर्व जाती, धर्म आणि मतांचे लोक येथे एकत्र आले. जगाने आपली एकता पाहिली. जगाने आपल्या संस्कृतीची आणि सभ्यतेची झलक पाहिली. कुंभमेळ्यात भारताच्या अर्ध्या लोकसंख्येने जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी साधू, संत आणि अनुयायांसह सुमारे 1500 लोक उपस्थित होते.

    Read more

    Kejriwal : कॅग रिपोर्टमध्ये केजरीवालांची पोलखोल : ‘आप’च्या मोहल्ला क्लिनिकमध्ये 70 % रुग्णांची केवळ मिनिटात तपासणी

    दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी आरोग्यसेवेशी संबंधित महालेखापाल (कॅग) यांचा अहवाल विधानसभेत मांडला. पूर्वाश्रमीच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या कार्यकाळात रुग्णालयात गरजेची औषधी, सुविधांचा तुटवडा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, उपकरणांचा तुटवडा आणि निधीचा वापर झाला नसल्याने दिल्लीच्या आरोग्यसेवेचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. मोहल्ला क्लिनिकमधील त्रुटीही निदर्शनास आल्या आहेत.

    Read more

    ट्रम्प – झेलेन्स्की खडाजंगी नंतर युरोपातल्या देशांचे राष्ट्रप्रमुख “खुश”; पण कारण काय??

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिस मध्ये झालेल्या खडाजंगीचे पडसाद जगभर उमटले.

    Read more

    Good news : चाकरमान्यांसाठी खुशखबर; पीएफवर मिळणार तब्बल 8.25 टक्के व्याजदर, 7 कोटी कर्मचाऱ्यांना लाभ

    कर्मचारी भविष्य निधी संगठनने (ईपीएफओ) २०२४-२५ वित्त वर्षात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. अर्थात गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही देशातील ७ कोटी कर्मचाऱ्यांना ८.२५% व्याज दिले जाणार आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ईपीएफओने व्याज दर ८.१५% वरून ८.२५% केला होता. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये व्याजदरात कपात करून ८.५% वरून ८.१% करण्यात आला होता. गेल्या चार दशकातील हा सर्वात कमी व्याज दर होता.

    Read more

    Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात 55 जण दबले; बद्रीनाथपासून 3 किमीवर दुर्घटना

    त्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथपासून सुमारे ३ किमीवर माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजता हिमस्खलन झाले. त्यामुळे बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५५ मजूर बर्फात अडकले. घटनेच्या वेळी ते कंटेनरमध्ये झोपलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर ३३ मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु उशिरा पुन्हा बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला मोहीम राबवणे कठीण झाले. काळोख झाल्याने शोधमोहीम जवळपास थांबवावी लागली. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.

    Read more

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ लाखांचा इनाम असलेल्या सात नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

    कुप्रसिद्ध टेकलगुडेम नक्षलवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका जोडप्यासह सात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ३२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. २०२१ मध्ये टेकलगुडम नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ सैनिक शहीद झाले होते.

    Read more

    Javed Akhtar : जावेद अख्तर-कंगना रनौतमध्ये तडजोड; 5 वर्षांनंतर मानहानीचा खटला मागे, सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने केले होते आरोप

    प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजप खासदार कंगना रनौत व ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांच्यात ५ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर अखेर पडदा पडला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली. या दोघांनीही तडजोड करून मानहानीचा खटला मागे घेतला.

    Read more

    Tripura border : त्रिपुरा सीमेवर बीएसएफने १५ बांगलादेशींना पकडले, मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न

    बांगलादेशातून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना सुरूच आहेत. आता सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने त्रिपुरामध्ये बांगलादेशातील १५ नागरिकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे, बीएसएफने दोन वेगवेगळ्या कारवाईत सात मुलांसह १५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यासोबतच तीन भारतीय दलालांनाही अटक करण्यात आली आहे.

    Read more

    ट्रम्प – झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये तुफान खडाजंगी; अमेरिका – युक्रेन संबंधात तणाव!!

    सर्वसाधारणपणे राजनैतिक संबंधांमध्ये घडत नाही अशी तुफान खडाजंगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झाली. त्यामुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स देखील सामील झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पडसाद उमटले. जगभरातल्या राजनैतिक वर्तुळामध्ये तो खळबळजनक चर्चेचा विषय ठरला.

    Read more

    Swargate rape case : स्वारगेट रेपप्रकरणी मोठा खुलासा : आरोपीचा 7 वर्षांचा मुलगा, तरीही समलैंगिक संबंध ठेवून कमवायचा पैसे

    स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय गाडे या आरोपीच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रेमविवाह करून संसार थाटलेला असूनही, सात वर्षांचा मुलगा असतानाही, आरोपीने समलैंगिक संबंध ठेवून पैसे कमावले असल्याचा खुलासा पोलिस तपासात झाला आहे.

    Read more

    Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले- योगेश कदमांची हकालपट्टी करा, असंवेदनशील गृहराज्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी बाजूला करावा!

    महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

    Read more

    Devendra Fadnavis : राज्यात 30 हजारांवर रोजगार निर्मिती होणार; 1660 पेट्रोल पंप सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञान क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक इंट्राप्रिनियर असोसिएशन’द्वारे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित आशिया खंडातील सर्वात मोठ्या कुत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रदर्शन असलेल्या ‘मुंबई टेक वीक 2025’ कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेतली

    Read more

    Chief Minister Fadnavis : राज्यात 14 खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील प्रमुख खाणपट्टे सुरू होऊन राज्याला महसूल प्राप्त होणे यासाठी बैठक संपन्न झाली.

    Read more

    Navi Mumbai नवी मुंबईतील एज्युसिटीला अमेरिकेतील कनेक्टिकट राज्य करणार मदत

    महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुकीचे हब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.

    Read more