• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 42 of 1563

    wankhadepravin

    Gurnoor Kaur : पंजाबच्या तरुणीची जगभरात चर्चा! ऑक्सिमीटरमधील वर्णभेदाची समस्या सोडवली; कोण आहे गुरनूर कौर?

    आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी मानली जाणारी कामगिरी करून पंजाबमधील तरुण संशोधक गुरनूर कौर चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्वचेच्या रंगामुळे ऑक्सिमीटरच्या रीडिंगमध्ये होणाऱ्या त्रुटींवर उपाय शोधणारे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा समोर आल्यानंतर तिचे नाव जागतिक स्तरावर गाजत आहे.

    Read more

    India-US Trade : भारत-अमेरिका व्यापार करारावर नवे संकट? सक्तीच्या मजुरीचा आरोप करत अमेरिकेची अतिरिक्त करवाढ प्रस्तावित

    भारत आणि अमेरिकेदरम्यान बहुप्रतिक्षित व्यापार कराराच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेने भारतासह ५४ देशांवर मोठी कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सक्तीच्या मजुरीतून तयार होणाऱ्या वस्तूंवर प्रभावी बंदी न घातल्याचा आरोप करत भारतातून येणाऱ्या आयातीवर अतिरिक्त १२.५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चांवर नव्या अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

    Read more

    Corporate Jihad : TCS पाठोपाठ Wipro मध्ये कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार; हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव; आरोपी मोहम्मद सादिकला अटक!!

    नाशिक मधल्या TCS कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहादचे भीषण वास्तव समोर आले आहे.

    Read more

    INDI : एकीकडे काँग्रेसचा विश्वासघात झाल्याचा आरोप, तर दुसरीकडे काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप; INDI आघाडीच्या बैठकीवर बहिष्काराचे सावट!!

    एकीकडे काँग्रेसचा विश्वासघात झाल्याचा आरोप, तर दुसरीकडे काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप!!, अशाप्रकारे INDI आघाडीच्या बैठकीपूर्वीच विरोधकांची दैना झाली. आघाडीच्या बैठकीवर बहिष्काराचे सावट पडले.

    Read more

    Trinamool Congress : ममतांची TMC फुटली, 58 आमदारांनी वेगळा गट तयार केला:ऋतब्रत बॅनर्जी विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित, 2 दिवसांपूर्वी पक्षातून काढले होते

    : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील बंडखोर आमदारांचा एक गट स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असून सुमारे ५० ते ५८ आमदार या गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    Read more

    Ayatollah Khamenei: खामेनींच्या अंत्यसंस्कारासाठी २ कोटी लोक जमणार; इराणमध्ये तीन शहरांत श्रद्धांजली कार्यक्रम; मशहदमध्ये होणार दफनविधी

    इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून या कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणी प्रशासनाच्या अंदाजानुसार, राजधानी तेहरानमध्येच सुमारे २ कोटी लोक उपस्थित राहू शकतात. त्यामुळे हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या अंत्ययात्रांपैकी एक ठरू शकतो.

    Read more

    DK Shivakumar : कर्नाटकात सत्तांतर पूर्ण! डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी; सिद्धरामय्या मंचावर उपस्थित, काँग्रेसने दाखवली एकजूट

    कर्नाटकच्या राजकारणातील अनेक महिन्यांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसने या सोहळ्यातून पक्षातील एकजूट आणि सत्तेचे सुरळीत हस्तांतरण दाखवण्याचा प्रयत्न केला.

    Read more

    Egypt : चीनलाही टाकले मागे! इजिप्तमध्ये उभारले जात आहे जगातील सर्वात मोठे चालकविरहित मोनोरेल जाळे

    वाहतूक क्षेत्रात नवा इतिहास रचण्याच्या दिशेने इजिप्तने मोठे पाऊल टाकले आहे. राजधानी कैरो आणि आसपासच्या भागांना जोडणारे जगातील सर्वात मोठे चालकविरहित मोनोरेल जाळे उभारले जात असून या प्रकल्पामुळे इजिप्तची गणना आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अग्रगण्य देशांमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे, लांबी आणि व्याप्तीच्या बाबतीत हा प्रकल्प चीनमधील अनेक मोठ्या मोनोरेल प्रकल्पांनाही मागे टाकणार असल्याचा दावा केला जात आहे.

    Read more

    Ahmedabad : अहमदाबादमध्ये मोठी कारवाई; बेकायदा वास्तव्यास असलेले ८९० बांगलादेशी नागरिक ताब्यात, पोलिसांचे विशेष अभियान

    : गुजरातमधील अहमदाबाद शहरात पोलिसांनी बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल ८९० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून सुरक्षा यंत्रणांनी याला महत्त्वपूर्ण यश म्हटले आहे.

    Read more

    Middle East Crisis : मध्यपूर्वेतील तणावामुळे भारत सतर्क! विमानभाड्यांवर मर्यादा, ७७ लाख नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारची मोठी तयारी

    मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संकटाचा परिणाम भारतीय प्रवासी, उद्योग क्षेत्र आणि परदेशात काम करणाऱ्या लाखो भारतीयांवर होऊ नये यासाठी विमानभाड्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच रोजगार आणि अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

    Read more

    शरद पवार – दिलीप वळसे पाटलांच्या भेटीगाठी; पण (भाजपच्या परवानगीशिवाय) विलीनीकरणाची नाही संधी!!

    शरद पवार – दिलीप वळसे पाटलांच्या भेटीगाठी; पण (भाजपच्या परवानगीशिवाय) विलीनीकरणाची नाही संधी!!, हेच राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.

    Read more

    ‘OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का सहन करणार नाही’; १२ जूनला राज्यभर आंदोलनाची घोषणा, सरकारला अंतिम इशारा

    महाराष्ट्रातील ओबीसी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत राज्य सरकारला अंतिम इशारा दिला आहे. ओबीसींच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

    Read more

    Sanjay Shirsat : ‘निदा खान प्रकरणाची सखोल चौकशी करा’; इम्तियाज जलील यांच्यावरही संशयाची सुई, संजय शिरसाट यांची मागणी

    छत्रपती संभाजीनगरातील चर्चित निदा खान प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नावही तपासात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! बाजार समिती शुल्कातून सूट; नाफेड-एनसीसीएफकडून थेट खरेदीचा मार्ग मोकळा

    राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांकडून होणाऱ्या कांदा खरेदीवर बाजार समिती शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

    Read more

    Ravindra Chavan : विधान परिषदेच्या रणधुमाळीत बंडखोरीची धास्ती; ‘पक्षविरोधी मतदान टाळा’, रविंद्र चव्हाण यांचे आमदारांना आवाहन

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या आमदारांना एकजूट राखण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. मतदानाच्या तोंडावर क्रॉस व्होटिंग आणि बंडखोरीच्या शक्यतांवर चर्चा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदारांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    School Bus : पालकांना मोठा आर्थिक झटका! शाळा बसच्या शुल्कात वाढ; इंधन, देखभाल खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय

    नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच राज्यातील लाखो पालकांना आणखी एक आर्थिक धक्का बसला आहे. शाळा बस आणि विद्यार्थी वाहतूक सेवांच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून जून महिन्यापासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या देखभाल खर्चातील वाढ आणि चालक-कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे बसचालक संघटनांचे म्हणणे आहे.

    Read more

    Maharashtra Farmer : शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग; राज्य सरकारने जिल्हानिहाय समित्या जाहीर केल्या, ६ जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होणार

    राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने जिल्हा आणि तालुकास्तरावरील समित्यांची घोषणा केली असून आता प्रत्यक्ष प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. सरकारने या समित्यांना ६ जुलैपर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

    Read more

    Delhi Hotel : दिल्लीतील हॉटेलला भीषण आग; ११ परदेशी नागरिकांसह २२ जणांचा होरपळून मृत्यू, परवानगी ६ खोल्यांची पण उभारल्या २५!

    देशाची राजधानी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीने २२ जणांचा बळी घेतला असून मृतांमध्ये ११ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. आग इतकी भीषण होती की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बचाव पथके घटनास्थळी पोहोचेपर्यंत धूर आणि ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली होती. या दुर्घटनेनंतर हॉटेलच्या बांधकाम आणि परवानग्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    Read more

    South Korea : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटेत दक्षिण कोरियाची झेप; शेअर बाजाराचे मूल्य ५ लाख कोटी डॉलर पार, भारताला मागे टाकले

    जागतिक शेअर बाजारात दक्षिण कोरियाने मोठी कामगिरी करत भारताला मागे टाकले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्धसंवाहक उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य ५ लाख कोटी डॉलरच्या पुढे गेले आहे. यामुळे आशियातील प्रमुख भांडवली बाजारांच्या क्रमवारीत दक्षिण कोरियाने भारतावर आघाडी घेतली आहे.

    Read more

    BSF – BGB : भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बांगलादेशी बॉर्डर सिक्युरिटी गार्डला व्यवस्थित समजावून सांगणार सीमेवरची सुरक्षा व्यवस्था!!

    पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जाऊन शुभेंदू अधिकारी यांचे भाजपचे सरकार आल्याबरोबर बांगलादेश बॉर्डरवर कुंपण घालण्याचे काम सुरू झाले. त्याचबरोबर पश्चिम बंगाल मध्ये बांगलादेशातून घुसलेले घुसखोर पुन्हा बांगलादेशात परतायला सुरुवात झाली.

    Read more

    Khan Sir : खान सर यांच्या कोचिंग संस्थेत घुसून हल्ला; सुरक्षा रक्षकाला मारहाण, पाटण्यात खळबळ

    बिहारची राजधानी पटणा येथे प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक खान सर यांच्या कोचिंग संस्थेत घुसून काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संस्थेच्या सुरक्षा रक्षकाला गंभीर मारहाण करण्यात आली असून तो जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    Read more

    Shashi Tharoor : वंदे मातरम्’ पूर्ण गाणे प्रत्येक कार्यक्रमात वाजवणे गरजेचे आहे का?’; शशी थरूर यांच्या वक्तव्याने नवा वाद

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार Shashi Tharoor यांनी ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण आवृत्तीच्या सक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. प्रत्येक सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती वाजवणे किंवा गायन करणे ही “अनावश्यक आणि त्रासदायक सक्ती” असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

    Read more

    China : कर्करोग उपचारात चीनची मोठी झेप; अमेरिकन रुग्णांवर चाचणीसाठी चिनी औषध कंपनीचे संशोधन, जागतिक औषध उद्योगाचे लक्ष वेधले

    कर्करोगावरील उपचारांच्या क्षेत्रात चीन झपाट्याने पुढे जात असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका चीनी जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केलेल्या नव्या कर्करोगविरोधी औषधाची अमेरिकेतील रुग्णांवर चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे जागतिक औषध उद्योगात चीनच्या वाढत्या प्रभावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    TMC Splits : पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षात फूट; पण शिंदे पॅटर्नची मात्र खोटी हूल!!

    पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षात फूट; पण शिंदे पॅटर्नची मात्र खोटी हूल!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी करून पक्षात फूट पाडली

    Read more

    ममतांच्या TMC मध्ये फूट; 58 आमदारांचा वेगळा गट स्थापन; ममतांनी हाकलून दिलेले ऋतब्रत बॅनर्जी विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी!!

    पश्चिम बंगालमध्ये सत्ता जाताच ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये फूट पडली. ममतांनी सोमवारी पक्षातून काढून टाकलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना 58 बंडखोर आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते जाहीर केले.

    Read more