• Download App
    BSF - BGB : भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बांगलादेशी बॉर्डर सिक्युरिटी गार्डला व्यवस्थित समजावून सांगणार सीमेवरची सुरक्षा व्यवस्था!!

    BSF – BGB : भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बांगलादेशी बॉर्डर सिक्युरिटी गार्डला व्यवस्थित समजावून सांगणार सीमेवरची सुरक्षा व्यवस्था!!

    नाशिक : पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जाऊन शुभेंदू अधिकारी यांचे भाजपचे सरकार आल्याबरोबर बांगलादेश बॉर्डरवर कुंपण घालण्याचे काम सुरू झाले. त्याचबरोबर पश्चिम बंगाल मध्ये बांगलादेशातून घुसलेले घुसखोर पुन्हा बांगलादेशात परतायला सुरुवात झाली. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा बांगलादेशींना हाकलून द्यायला सुरुवात झाली. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर वेगळा तणाव निर्माण झाला. बांगलादेशी सिक्युरिटी गार्डच्या सैनिकांनी दादागिरी करायचा प्रयत्न केला. कुंपण घालायच्या कामात त्यांनी अटकाव केला. पण भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी त्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देऊन कुंपण घालण्याचे काम व्यवस्थित सुरू ठेवले.

    – समजावून सांगण्यासाठी बैठक

    भारतातून बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी सुरूच ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) बांगलादेशी सेक्युरिटी गार्डला (BGB) सीमेवरची सुरक्षा व्यवस्था करण्यासंदर्भात व्यवस्थित समजावून सांगणार आहे. यासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बांगलादेशी सिक्युरिटी गार्ड यांच्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन दिवसांची बैठक आठ जून ते 11 जून असे होणार असून त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर गंभीर चर्चा करण्यात येणार आहे.

    – कुंपण घालण्याचा मुद्दा ऐरणीवर

    या चर्चेमध्ये प्रामुख्याने भारत आणि बांगलादेश यांच्या संपूर्ण सीमेवर कुंपण घालण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला जाणार आहे. त्याचबरोबर बांगलादेशातून भारतात होणारी मानवी, पशू आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे. भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (BSF) बांगलादेशी सिक्युरिटी गार्ड (BGB) कडे या संदर्भात विशेष सहकार्य मागितले आहे. बांगलादेशी सिक्युरिटी गार्डने आत्ता तरी भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणे शक्य होणार आहे.

    – विशेष महत्त्व काय??

    पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) आधीच तिथे तैनात आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे सुमारे 60 हजार जवान पश्चिम बंगाल मध्ये सध्या कार्यरत आहेत आणि ते पुढचे काही महिने तिथेच कार्यरत राहणार आहेत. पश्चिम बंगाल मधून आणि देशाच्या अन्य राज्यांमधून बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठविणे आणि भारत-बांगलादेश यादरम्यानची संपूर्ण सीमा कुंपण घालून पूर्णपणे सुरक्षित करणे हा भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सगळ्यात मोठा अजेंडा आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम त्यांना करायचे आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) आणि बांगलादेशी बॉर्डर गार्ड (BGB) यांच्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

    BSF – BGB: The Indian Border Security Force will thoroughly explain the border security arrangements to the Bangladeshi Border Security Guard.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nagaland IED Blast : नागालँडमध्ये IED स्फोट, आसाम रायफल्सचा जवान शहीद; इतर चार जखमी, सुरक्षा कर्मचारी नियमित हालचाली करत होते

    Supreme Court : सार्वजनिक ठिकाणी पोर्न पाहण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली; सुप्रीम कोर्ट म्हणाले- सरकारकडे जा, हा कायदा बनवणाऱ्यांचा प्रश्न आहे

    Ram Mandir Donation : राममंदिर देणगी चोरी- ट्रस्टने CEO भरती काढली; सर्वोच्च न्यायालयाने SIT कडून अहवाल मागवला