Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात 55 जण दबले; बद्रीनाथपासून 3 किमीवर दुर्घटना
त्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथपासून सुमारे ३ किमीवर माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजता हिमस्खलन झाले. त्यामुळे बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५५ मजूर बर्फात अडकले. घटनेच्या वेळी ते कंटेनरमध्ये झोपलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर ३३ मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु उशिरा पुन्हा बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला मोहीम राबवणे कठीण झाले. काळोख झाल्याने शोधमोहीम जवळपास थांबवावी लागली. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.