Karnataka : कर्नाटकात सर्व उत्पादनांवर कन्नड भाषा अनिवार्य, परिपत्रक जारी; सरकारी व खासगी दोन्ही विभागांत लागू
कर्नाटक सरकारने सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि व्यवसायांमध्ये कन्नड भाषा सक्तीची करण्याचा आदेश जारी केला आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रशासन, शिक्षण आणि व्यवसायात कन्नड भाषेला प्रोत्साहन देणे आहे. सरकारने १५ फेब्रुवारी २०२५ रोजी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले होते.