European : युक्रेन युद्धावर युरोपीय नेत्यांची बैठक लंडनमध्ये सुरू; फ्रान्स-ब्रिटनसह 16 देशांच्या नेत्यांचा समावेश
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये युरोपीय देशांची संरक्षण शिखर परिषद सुरू झाली आहे. युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत 15 देशांचे राष्ट्रप्रमुख, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री, नाटो सरचिटणीस, युरोपियन युनियन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल, त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतील. ही शिखर परिषद ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी बोलावली आहे.