Amit Shah : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप + अण्णा द्रमुक युती जाहीर; ईडापड्डी पलानीस्वामींकडे नेतृत्व!!
तामिळनाडू विधानसभेच्या 2026 एप्रिल मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांनी युती जाहीर केली.
तामिळनाडू विधानसभेच्या 2026 एप्रिल मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांनी युती जाहीर केली.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) १० एप्रिल रोजी दिल्ली न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले की, तहव्वुर राणा मुंबईसह देशातील इतर शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचत होता. विशेष न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्या न्यायालयात एनआयएने हा दावा केला. सुनावणीनंतर न्यायाधीशांनी तहव्वुर राणाला १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले.
योगगुरू बाबा रामदेव यांनी शरबत जिहादचे आरोप केले आहेत. बाबा रामदेव यांनी एका कंपनीवर हे आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की जर आपण त्यांचे सरबत प्यायलो तर मदरसे आणि मशिदी बांधल्या जातील. बाबा रामदेव काही पतंजली उत्पादनांची जाहिरात करत होते आणि त्यादरम्यान त्यांनी शरबत जिहादबद्दल बोलले.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चेन्नई येथे भाजपची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे.
दोन जमातींमधील वादामुळे मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात बुधवारी १७ एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला. मंगळवारी वादग्रस्त जागेवर आपापल्या समुदायाचे झेंडे फडकवण्यावरून झोमी आणि हमार जमातींमध्ये तणाव निर्माण झाला होता. वादग्रस्त जागा व्ही मुनहोइह आणि रेंगकाई गावांमध्ये आहे.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये ८ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. यापैकी ८ आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
होतील राहुल पंतप्रधान, त्या दिवशी चप्पल घालणार!!, अशी घनघोर भीष्म प्रतिज्ञा काँग्रेसच्या एका तरुण कार्यकर्त्याने केली आहे.
इकडे राहुल गांधींचे “री री री री री लॉन्चिंग” नीट होई ना, चालले बिहारमध्ये कन्हैया कुमारचे “लॉन्चिंग” करायला!! अशी अवस्था खरंच काँग्रेसची अहमदाबाद मधल्या महत्त्वाकांक्षी अधिवेशन नंतरही झाली आहे.
पॅक केलेल्या अन्नावर वॉर्निंग लेबलिंगबाबत तीन महिन्यांत नवीन नियम बनवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. यामध्ये प्रत्येक पॅक केलेल्या अन्नपदार्थाच्या पुढच्या बाजूला स्पष्ट इशारा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यामुळे लोकांना त्या वस्तूमध्ये किती साखर, मीठ किंवा हानिकारक चरबी आहे हे कळेल.
ट्रम्प यांनी त्यांच्या नवीन टॅरिफ धोरणावर ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर जागतिक गुंतवणूक कंपनी गोल्डमन सॅक्सने जागतिक मंदीचा अंदाज कमी केला आहे. ९ एप्रिल रोजी, गोल्डमनने पुढील १२ महिन्यांत मंदीची ६५% शक्यता वर्तवली. पण ट्रम्प यांच्या घोषणेच्या अवघ्या एका तासानंतर, गोल्डमनने मंदीचा अंदाज मागे घेतला.
बनेश्वरच्या सहाशे मीटरच्या रस्त्यावरून सात तास उपोषण करणाऱ्या सुप्रिया सुळेंची सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संत आहेत आणि गृहमंत्री अमित शहा यांचे व्यक्तिमत्व धाडसी आहे. मला त्यांच्यासारखे व्हायचे आहे.
पीडिताने केलेले आरोप खरे मानले तरी, असा निष्कर्ष काढता येतो की तिने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले होते.’ ती स्वतः बलात्काराला जबाबदार आहे. वैद्यकीय तपासणीत हायमेन तुटलेले आढळले, परंतु डॉक्टरांनी लैंगिक हिंसाचाराबद्दल काहीही सांगितले नाही.
अमेरिकेने चीनवरील व्यापार कर (टेरिफ) १२५% वरून १४५% पर्यंत वाढवला आहे. फेंटनाइलच्या तस्करीत चीनचा हात असल्याने २०% अतिरिक्त कर लावण्यात येईल. एक दिवस आधीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १२५% कराची घोषणा केली होती. दरम्यान, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाच्या तिढ्यावर तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. तथापि, टेरिफ दादागिरीसमोर झुकणार नाही, असे संकेत देऊन या मुद्द्यावर अमेरिकेला आधी पाऊल उचलावे लागेल, असे चीनने म्हटले आहे.
एफबी म्हणजे फुकटचा बाबूराव, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, या प्रसंगी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच मी पण एफबी म्हणजे ‘फेव्हरेट भाऊ’, असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
२०२८ च्या ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष आणि महिला क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये एकूण ६ संघ सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) बुधवारी याची घोषणा केली.
बसप प्रमुख मायावती यांच्या पुतणीने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, हापूरनगर पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणाचा पुरावा आहे, असंही भाजपने म्हटलं आहे.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपली प्रतिमा निर्मिती केली.
पश्चिम रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे की, माहीम खाडी पुलाच्या पुनर्बांधणीमुळे ११-१२ एप्रिल रोजी एकूण ५१९ गाड्या प्रभावित होतील. पश्चिम रेल्वे ११-१२ एप्रिल आणि १२-१३ एप्रिलच्या रात्री पुलाची दुरुस्ती करेल.
युक्रेन-रशिया संघर्षात ड्रोन हे एक नवीन लष्करी शस्त्र म्हणून उदयास आले आहे. सैन्य आणि उपकरणांचे बहुतेक नुकसान पारंपारिक तोफखाना किंवा बुलेटप्रुफ वाहनांमुळे झाले नाही तर ड्रोनमुळे झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी ही माहिती दिली
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर तेथील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. एकीकडे, रस्त्यावर खूप निदर्शने सुरू आहेत. दुसरीकडे, भारताने आता मोहम्मद युनूस सरकारविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून टाकणारा दहशतवादी तहव्वुर राणा याला घेऊन एनआयएचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. एजन्सीने त्याला अमेरिकेतून भारतात आणले आहे.
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायदा अधिकृतपणे लागू केला आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर एका दिवसानंतर, भाजपने देशभरात याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. याद्वारे मुस्लिम समुदायाला हा कायदा त्यांच्यासाठी कसा फायदेशीर आहे हे सांगितले जाईल. भाजपने या मोहिमेसाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच चीन, युरोपियन युनियन आणि भारत यांच्या विरोधात टेरिफ वॉर पुकारले आणि आता 90 दिवसांची सवलत देऊन एक पाऊल मागे घेतले