Waqf Act : भाजप मुस्लिमांना वक्फ कायद्याचे फायदे समजावून सांगणार
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायदा अधिकृतपणे लागू केला आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर एका दिवसानंतर, भाजपने देशभरात याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. याद्वारे मुस्लिम समुदायाला हा कायदा त्यांच्यासाठी कसा फायदेशीर आहे हे सांगितले जाईल. भाजपने या मोहिमेसाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.