काँग्रेसच्या मजबुतीसाठी काँग्रेसचे नेते आले अयोध्येत श्रीरामाच्या चरणी!!
काँग्रेसच्या मजबुतीसाठी काँग्रेसचे नेते आले अयोध्येत श्रीरामाच्या चरणी!!, असा मोठा “राजकीय चमत्कार” 2026 मधल्या रामनवमीच्या दिवशी आज घडला.
काँग्रेसच्या मजबुतीसाठी काँग्रेसचे नेते आले अयोध्येत श्रीरामाच्या चरणी!!, असा मोठा “राजकीय चमत्कार” 2026 मधल्या रामनवमीच्या दिवशी आज घडला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्याची गत जेफ्री एपस्टीनसारखी होऊ नये यासाठी त्याला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा, असे ते म्हणालेत. राज्यातील 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचा दावाही आव्हाड यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी विधानसभा सभागृहात पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) च्या सर्वांगीण विकासाबाबत माझी भूमिका ठामपणे मांडली.
केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की, आपल्याकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाही. पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या टर्मिनल्सवरही पुरेसा साठा उपलब्ध आहे.
बुधवारी संसदेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेते तारिक अन्वर म्हणाले की, पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे, तर भारत मूकदर्शक बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा खळबळजनक इशारा तटकरे यांनी दिला आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर तटकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यात कोणाच्या बापालाही सोडणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिले आहे.
इराणने अमेरिकेचा युद्धविराम प्रस्ताव फेटाळला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर संघर्ष संपवणार नाही, असे इराणने म्हटले आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे.
पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत समितीने सावध पवित्रा घेतला आहे. अहवालात त्यांच्या नावाचा थेट कारवाईसाठी उल्लेख नाही. मात्र, “भविष्यातील फौजदारी तपासात जर अधिक लोकांचा सहभाग किंवा पुरावे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते,” असे समितीने नमूद केल्याने हा विषय अद्याप संपलेला नाही, हे स्पष्ट होते.
आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीपर्यंत तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकाल. यासोबतच, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास मिळणाऱ्या परताव्याच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेपासून 4 ऐवजी 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास परतावा मिळेल.
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी देशाकडे अणुबॉम्ब असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सरकारी माध्यमांनुसार, त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले हे सिद्ध करतात की, त्यांच्या देशाचा अणुबॉम्ब ठेवण्याचा निर्णय योग्य होता.
गुजरात भाजपने 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले वचन आता 31 वर्षांनी पूर्ण केले आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) विधेयक सादर केले. यासोबतच उत्तराखंडनंतर UCC लागू करणारे गुजरात देशातील दुसरे राज्य बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधेयक सादर करताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तसेच भाजपच्या सदस्यांनी बाके वाजवून विधेयकाचे स्वागत केले. या संपूर्ण चर्चेदरम्यान हलाला प्रथा, शाहबानो प्रकरण, धर्मेंद्र यांचे दुसरे लग्न आणि श्रद्धा वालकर प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला.
कर्नाटक सरकारने मंगळवारी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरासंदर्भात मसुदा धोरण (ड्राफ्ट पॉलिसी) जारी केले आहे. यात शिफारस करण्यात आली आहे की, अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनासाठी स्क्रीन टाइम दररोज 1 तास
धर्मांतर आणि अनुसूचित जातीच्या (एससी) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने व्यापक परिणाम करणारा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्म सोडून इतर धर्म (उदा. ख्रिश्चन, इस्लाम धर्म) स्वीकारत असेल तर ती ‘अनुसूचित जाती’ची सदस्य राहणार नाही. कोर्टाने म्हटले की ही वैधानिक बंदी ‘पूर्ण’ आहे आणि यात कोणत्याही अपवादाला वाव नाही.
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.
दिल्लीच्या सत्ताकेंद्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्यामुळे 79 वर्षीय सोनिया गांधी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणात ठेवण्यात आले असून सध्या
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दगडखाणी आणि गौण खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, गौण खनिज क्षेत्रातील मागील पाच वर्षांतील उत्खननाचे तीन महिन्यांत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टीम) द्वारे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
भारतात आता स्वयंपाकाच्या गॅसचे (LPG) अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल वापरण्याची तयारी सुरू आहे. सरकार इथेनॉल-आधारित कुकिंग स्टोव्ह (चूल) बनवण्यावर काम करत आहे.