मोठी बातमी! उत्तरप्रदेशात तिसरी आघाडी स्थापन, स्वामी प्रसाद मुख्यमंत्रिपदाचा चेहरा!
उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ची राजकीय वीण विणण्यास सुरुवात झाली आहे. भाजप सत्तेची हॅटट्रिक करून इतिहास घडवू इच्छित आहे
उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ची राजकीय वीण विणण्यास सुरुवात झाली आहे. भाजप सत्तेची हॅटट्रिक करून इतिहास घडवू इच्छित आहे
गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला.
बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली.
बड्या नेत्यांच्या उलट्यापाट्या भेटीगाठी, एकमेकांची खेचाखेची; पण कार्यकर्त्यांच्या मात्र ओढाताणी!! असला प्रकार महाराष्ट्रात सुरू झालाय.
सिंगापूर कंटेनर जहाजाच्या अपघातानंतर तैवान सरकारने भारतीय नौदल आणि तटीय रक्षकांचे मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. भारतातील तैवानने सोशल मीडियावर लिहिले – भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने केलेल्या जलद बचाव कार्याबद्दल तैवान सरकार कृतज्ञ आहे. बेपत्ता क्रू सदस्यांच्या सुरक्षित परतीची आणि जखमींच्या जलद बरे होण्याची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
सीरिया सरकारने मंगळवारी पुरुष आणि महिलांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू केला. या अंतर्गत, महिलांना आता समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक असेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. वाढदिवशी भेटणार नाही. मात्र कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी पत्र लिहून मनसैनिकांना केले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले आहे.
भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी नवीन नियम आणले आहेत. आता प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही हे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी कळेल.
मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.
आता तत्काळ तिकिटांसाठी आधार आवश्यक असेल. आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाइटवर आधार पडताळणी करावी लागेल. हा नियम १ जुलैपासून लागू होईल. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पहिल्या ३० मिनिटांसाठी फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.
गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजासाठी दिलेलं SEBC (Socially and Educationally Backward Class) आरक्षण सध्या लागू आहे आणि त्यावर कोणतीही स्थगिती (stay) दिलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर बुधवारी विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू केली आहे. या सुनावणीमुळे मराठा विद्यार्थ्यांना सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी SEBC आरक्षणाचा लाभ मिळत राहणार आहे.
जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!! असला प्रकार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलाय.
बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ सुरू आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल मोठा दावा केला, त्यांनी सांगितले की ते या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले होते. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की शेख हसीना यांनी भारतात राहून केलेल्या विधानांमुळे बांगलादेशात असंतोष पसरला.
माजीमंत्री विक्रम सिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित सिंह पाटणकर यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याचे कारण सांगितले आहे. सत्यजित पाटणकर म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प भाजप सरकारमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
कर्नाटक वाल्मिकी घोटाळ्याची चौकशी करताना ईडीने बेल्लारी येथील काँग्रेस खासदार ई. तुकाराम आणि तीन आमदारांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी फ्रँचायझी खरेदी करण्याच्या अफवांबद्दल आणि जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्टे केली आहे. ते म्हणाले की आम्हाला लोकांच्या भावना माहीत आहेत आणि आम्ही त्यांच्या जीवनाचा आदर करतो. त्यांनी विचारले की मला आरसीबीची कशासाठी गरज आहे?
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ४ जून रोजी त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) प्रदान करण्यात आले. तसेच, सोमवारी त्यांना DGMO तसेच उप-प्रमुख लष्कर प्रमुख (रणनीती) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरातील दलित आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आव्हानांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की देशातील सुमारे ९०टक्के विद्यार्थी वंचित समुदायातून येतात आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. ते म्हणजे १. निवासी वसतिगृहांची वाईट अवस्था आणि २. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये प्रचंड अनियमितता आणि विलंब.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललात “रिचर्ड निक्सन” आणि जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरत चाललाय पाय असेच ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकीय हालचालींमधून समोर आले.
ईदच्या उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणी मांसाचे तुकडे फेकल्या जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की राज्यातील हिंदूंविरुद्ध गोमांस हे शस्त्र बनवले जात आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण सिंह यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे लक्ष्मण सिंह यांना काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे.
टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागितली आहे. बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करून मस्क यांनी आपली चूक मान्य केली.
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताविराेधातच संघर्ष करण्याची तयारी केली हाेती. मात्र, बांग्ला देशाच्या लष्करप्रमुखांनीच हा डाव उधळून लावला. सरकारवरील नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी युनूस यांनी भारतासोबत सीमेवर छोटा मोठा संघर्ष करण्याची योजना बनवली होती. त्यातून देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि लोक त्यांच्यासोबत उभे राहतील ही अपेक्षा होती. विना निवडणूक सरकार टिकवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु बांगलादेशाचे सैन्य प्रमुख वकार उज जमां यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी हा डाव उधळून लावला.