• Download App
    Raj Thackeray वाढदिवशी भेटणार नाही, कोणतेही अर्थ काढू नका,

    Raj Thackeray : वाढदिवशी भेटणार नाही, कोणतेही अर्थ काढू नका, राज ठाकरे यांचे पत्र

    Raj Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Raj Thackeray  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. वाढदिवशी भेटणार नाही. मात्र कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी पत्र लिहून मनसैनिकांना केले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले आहे.Raj Thackeray

    माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय महाराष्ट्र! अशी सुरुवात करून राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, येत्या 14 जून 2025 ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी… पण मनापासून सांगतोय की असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.



    गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही, पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट ही ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम ! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!

    पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.

    माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असे राज ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे.

    Will not meet on birthday, don’t try to find reasons, Raj Thackeray’s letter

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांचा आवाज वापरून अभिनेता आमिर खानची फसवणूक; शाहूपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार; जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये याची तरतूद करू

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे