• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 3 of 1342

    Pravin Wankhade

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- ऑपरेशन सिंदूरने अन्यायाचा बदला घेतला; दिवाळीनिमित्त लिहिले ‘राष्ट्राला पत्र’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात’ जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “अयोध्येत भव्य राम मंदिराच्या बांधकामानंतरची ही दिवाळी दुसरी दिवाळी आहे.”पंतप्रधानांनी भगवान श्रीराम यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याबद्दल सांगितले. मोदी म्हणाले की, राम आपल्याला नीतिमत्ता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. मोदींनी पत्रात अलिकडेच झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” चाही उल्लेख केला.

    Read more

    Trump : झेलेन्स्कींना ट्रम्प म्हणाले- रशिया युक्रेनचा नाश करेल, पुतिन यांच्या अटी मान्य करा आणि युद्ध संपवा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना रशियाच्या अटी मान्य करण्याचे आवाहन केले आहे आणि जर पुतिन यांनी तसे केले नाही तर ते युक्रेनचा नाश करतील अशी धमकी दिली आहे, असे फायनान्शियल टाईम्सने रविवारी वृत्त दिले.

    Read more

    Chitapur Karnataka : कर्नाटकच्या चित्तपूरमध्ये RSSच्या संचलनाला परवानगी नाकारली; भीम आर्मीलाही परवानगी दिली नाही

    कर्नाटकातील चित्तपूर येथे RSS आणि भीम आर्मीच्या मार्चला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. प्रशासनाने म्हटले आहे की एकाच दिवशी दोन प्रमुख संघटनांच्या रूट मार्चमुळे परिसरात तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे शांतता भंग होण्याची भीती आहे.

    Read more

    Bachchu Kadu : आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका, बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – मरण्यापेक्षा लढणे सुरू करा

    प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली आहे. तसेच हा कार्यक्रम सुरू केला, तर सरकार गुडघ्यावर येईल. पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले. बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते.

    Read more

    सत्तेच्या वळचणीला राहूनही काका – पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझड!!

    सत्तेच्या वळचणीला राहून देखील काका पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझडच होत असल्याचे चित्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले. सोलापूर जिल्हा आणि नवी मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून गळती समोर आली.

    Read more

    Vijay Wadettiwar : स्थानिकच्या निवडणुकीत मूळ OBC ला फटका बसणार- वडेट्टीवारांचा दावा; मराठा समाज सर्व जागा घेऊन जाण्याची व्यक्त केली भीती

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक मूळ ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या सर्व जागा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेले मराठा समाजाचे उमेदवार घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने ओबीसी समुदायात एकच खळबळ माजली आहे.

    Read more

    ठाण्यात दिवाळी मिलनाचे निमित्त आणि विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका; शिंदे सेनेच्या स्वबळाचा इतरांना तडाखा!!

    ठाणे शहर आणि जिल्ह्यात भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळाचे आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता तरी एकनाथ शिंदे ठाण्यावरची पकड सहजासहजी निसटू देणार नाहीत याची चुणूक त्यांनी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने दाखवून दिली. दिवाळीच्या सणात त्यांनी ठाण्यात ठाण मांडले असून दररोज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यातूनच शिंदे सेना इतरांना स्वबळाचा तडाखा द्यायच्या बेतात दिसत आहे.

    Read more

    Nitesh Rane : नीतेश राणे यांचा सवाल- हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का?, राज ठाकरेंच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा असल्याचा आरोप

    शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंना राहुल, राऊतांचा वाण नाही, पण गुण लागला; 96 लाख खोटे व्होटर असल्याच्या आरोपावर भाजपचा पलटवार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more

    अजितदादा भाजप समोर तर किस झाड की पत्ती; संजय राऊत यांचा टोला

    अजितदादा तर भाजप समोर किस झाड की पत्ती आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.

    Read more

    Gopichand Padalkar : जत साखर कारखान्याचे हंगामात धुराडे पेटू देणार नाही; आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा

    जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या कारखान्याची दिवाळखोरी आणि पुढील विक्री हा विषय पुन्हा पेटला असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी जोरदार भूमिका घेत संघर्षाची हाक दिली आहे.

    Read more

    Ramdas Athawale : राज ठाकरेंकडे भाषणे देण्याची कला, पण त्याने नेतृत्व होत नाही, रामदास आठवले यांचा निशाणा

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

    Read more

    PM Modi : INS विक्रांतवर पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी, म्हणाले- ऑपरेशन सिंदूरवेळी तिन्ही दलांनी पाकिस्तानची झोप उडवली

    तिन्ही सशस्त्र दलांमधील असामान्य समन्वय तसेच नौदलाने निर्माण केलेली भीती, हवाई दलाचे असाधारण कौशल्य व लष्कराच्या शौर्यामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला काही क्षणांतच गुडघे टेकावे लागले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले. आयएनएस विक्रांतने पाकिस्तानची झोप कशी उडवली होती हेही आपण पाहिल्याचे मोदींनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने नवीन ध्वज स्वीकारला याचाही उल्लेख मोदींनी भाषणातून केला. गोव्याच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली. त्या वेळी मोदी म्हणाले की, ‘स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.’

    Read more

    Ola CEO Bhavish Aggarwal : ओलाचे CEO भाविश अग्रवाल यांच्याविरोधात FIR; अभियंत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

    ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. बंगळुरू पोलिसांनी एफआयआरमध्ये कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी सुब्रत कुमार दास यांचेही नाव घेतले आहे.

    Read more

    Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांचा मेधा कुलकर्णींना टोला, सरकार असल्याच्या थाटात वागू नये; शनिवारवाड्याबाहेरील राड्यावरून सुनावले

    पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाड्याच्या आवारातील नमाज पठणावरून झालेल्या वादात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट लक्ष्य केले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या शनिवार वाड्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास, तिथे स्थानिक प्रशासन आहे. त्यामुळे ‘इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये,’ असा सणसणीत टोला गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना लगावला.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला- इतिहासात पापाचे धनी होऊ नका, तुम्ही कोणते विष पोसत आहात हे डोळे उघडून पाहा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.

    Read more

    Maharashtra Government : राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे डिजिटायझेशन, सर्व नोंदी एका क्लिकवर

    राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ या नव्या प्रणालीअंतर्गत प्रशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन करण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व सेवाविषयक व्यवहार एकाच प्रणालीद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतील.

    Read more

    Pune Jain Boarding : पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहारास धर्मादाय आयुक्तांची स्थगिती, जमीन बेकायदा विकल्याच्या मुद्द्यावर राजकारण

    पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, आता धर्मादाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जे व्यवहार झाले, ते जैसे थे ठेवण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले असून, एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यात धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे.

    Read more

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक, इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालयास शासनाची मंजुरी; 92.92 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

    मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, विकासनगर, लेबर कॉलनी परिसरात आधुनिक आणि भव्य ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक व इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय’ उभारण्यासाठी ९२.९२ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

    Read more

    Bihar Congress : पैसे देऊन तिकिटे विकली, बिहार काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, नेत्यांचा थेट आरोप — “दहा जागाही जिंकणार नाही पक्ष

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रचंड असंतोष उसळला आहे. तिकीट वाटपात पैशांची देवाणघेवाण झाली असा थेट आरोप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केला असून, त्यामुळे महागठबंधनमधील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत.

    Read more

    विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट; 2029, 2035, 2047 तीन टप्प्यांतल्या विकासाचा रोडमॅप

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मसुद्यासंदर्भात सल्लागार समितीसह बैठक पार पडली.

    Read more

    Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात ‘नो किंग’ निदर्शने; हजारो लोक रस्त्यावर उतरले

    अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये शनिवारी हजारो लोकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने केली, ज्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या राजवटीत देश वेगाने हुकूमशाहीकडे सरकत आहे.

    Read more

    mohan bhagwat : सरसंघचालक म्हणाले- आपल्याला ‘मॅकॉले नॉलेज सिस्टिम’पासून मुक्त व्हावे लागेल; यामुळे आपले विचार परकीय झाले

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, भारतीयांना त्यांच्या ज्ञान परंपरेला समजून घेण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी ‘मॅकॉले नॉलेज सिस्टीम’च्या परकीय प्रभावापासून पूर्णपणे मुक्त व्हावे लागेल.

    Read more

    Louvre Museum : फ्रेंच संग्रहालयातून नेपोलियनचे 9 मौल्यवान दागिने चोरीला; चोरांनी भिंतीवर चढून कटरने खिडकी कापून आत प्रवेश केला

    रविवारी सकाळी ९ वाजता फ्रान्सच्या प्रसिद्ध लूव्र संग्रहालयात चोरी झाली. फ्रेंच संस्कृती मंत्री रशिदा दाती म्हणाल्या की, चोर दागिने घेऊन पळून गेले. त्यांनी X वर लिहिले की, “आज सकाळी लूव्र संग्रहालय उघडताच चोरी झाली.”

    Read more

    Nilgiri Railway : तामिळनाडूच्या नीलगिरी रेल्वे मार्गावर भूस्खलन, अनेक ट्रेन रद्द, पुढील 7 दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा

    तामिळनाडूमधील नीलगिरी माउंटन रेल्वे (NMR) मार्गावर भूस्खलन झाल्यानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्गावर अनेक ठिकाणी पर्वतांचे ढिगारे रुळांवर पडले आहेत. कल्लर आणि कुन्नूर दरम्यान खडक, चिखल आणि पडलेल्या झाडांमुळे रुळ बंद झाले आहेत.

    Read more