• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 189 of 1540

    wankhadepravin

    Yunus Government : बांगलादेशात कट्टरपंथीयांचा वरचष्मा, युनूस यांनी शाळांमध्ये संगीत शिक्षकांची भरती रद्द केली

    बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने देशातील सर्व प्राथमिक शाळांमधील संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती पूर्णपणे रद्द केली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कट्टरपंथी इस्लामिक संघटनांच्या विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आला. संगीत इस्लामच्या विरोधात आहे असा दावा करून हे कट्टरपंथी गेल्या अनेक महिन्यांपासून या शिक्षकांची भरती रद्द करण्याची मागणी करत आहेत.

    Read more

    Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यातील आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. आरोग्य सुविधांच्या या विकेंद्रीकरणाचाही जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    Read more

    Election Commission : विरोधकांचा बोगस मतदानाचा मुद्दा; दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी टूल तयार, राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण

    राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार करण्यात आले असल्याचे निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. तसेच या मतदारांशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Read more

    Dick Cheney : अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे निधन; सर्वात शक्तिशाली उपराष्ट्रपती म्हणून ओळख

    अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की, त्यांचे निधन न्यूमोनिया आणि हृदयरोगा झाले.

    Read more

    Phaltan Doctor Suicide : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, कुटुंबाला सुरक्षा द्या, दोषींना कठोर शिक्षा करा; राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

    फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

    Read more

    Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

    राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

    Read more

    Haris Rauf : ICCने हॅरिस रौफवर बंदी घातली; आशिया कपदरम्यान पाकिस्तानी गोलंदाजाने लढाऊ विमान पाडण्याचा इशारा केला होता

    वृत्तसंस्था दुबई : Haris Rauf  21 सप्टेंबर रोजी भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान लढाऊ विमान पाडण्याचा इशारा केल्याबद्दल आयसीसीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफवर दोन सामन्यांची […]

    Read more

    Raj Thackeray : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले, तळपायाची आग मस्तकात गेली, ते सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!

    राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. तसेच दुबार मतदार दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी टीका केली आहे.

    Read more

    Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण; सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागवला अहवाल; दिवाळीला फक्त 9 AQI स्टेशन कार्यरत होते

    दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एमसी मेहता प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

    Read more

    Trump : ट्रम्प मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवू शकतात; ड्रग्ज कार्टेल्सवर ड्रोन हल्ले करण्याची योजना

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी अमेरिकन लष्करी आणि गुप्तचर अधिकारी मेक्सिकोला पाठवण्याची तयारी करत आहेत.

    Read more

    मतदार याद्यांवरून करा आरडाओरडा, पण आता निवडणुकांना सामोरे जा!!

    मतदार याद्यांवरून करा आरडाओरडा, पण आता निवडणुकीला सामोरे जा!!, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाने अवस्था करून ठेवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 239 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना जी अप्रत्यक्ष घोषणा केली ती महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दिशेनेच गेली सुप्रीम कोर्टानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करा असे आदेश दिलेत याची आठवण राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत करून दिली. यातच अप्रत्यक्षपणे त्यांनी जिल्हा परिषदा महापालिका या निवडणुकांची सुद्धा घोषणा करून टाकली.

    Read more

    Tharoor : थरूर यांनी लिहिले- भारतात राजकारण कौटुंबिक व्यवसाय, गांधी कुटुंबाचे उदाहरण देऊन म्हटले-“गुणवत्तेवर आधारित व्यवस्था पाहिजे”

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतातील घराणेशाही राजकारणावर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन प्रोजेक्ट सिंडिकेटसाठी लिहिलेल्या लेखात थरूर म्हणाले, “भारतातील राजकारण हा एक कुटुंबाचा व्यवसाय बनला आहे. जोपर्यंत राजकारण कुटुंबांभोवती फिरत राहील तोपर्यंत लोकशाही सरकारचा खरा अर्थ अपूर्ण राहील.”

    Read more

    Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- लोकसभेत भाजपला काही ठिकाणी अजिबात मत मिळाले नाहीत, मविआकडून एक प्रकारचा व्होट जिहाद

    भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने जो बोगस मतदानाच्या विरोधात मोर्चा सुरू केला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.

    Read more

    महाराष्ट्रात 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, वाचा संपूर्ण टाईमटेबल!!

    विरोधकांनी मतदार याद्यांवर तीव्र आक्षेप घेऊन निवडणुकीच्या विरोधात वातावरण निर्मिती केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

    Read more

    Prashant Padole : शेतकऱ्यांचे हक्क दिले नाही तर तुम्हाला उडवून देऊ; काँग्रेस खासदाराची थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना धमकी

    भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

    Read more

    महाराष्ट्रात महात्मा फुले आरोग्य योजनेचा विस्तार, 2399 आजारांवर मोफत उपचारांचा समावेश, फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत 21 महत्वपूर्ण निर्णय

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने 21 महत्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.

    Read more

    Central Government : केंद्र सरकारने पेन्शनधारकांना दिला दिलासा; चुकून जास्त पेन्शन मिळाल्याबद्दल आता कोणतीही वसुली केली जाणार नाही

    कार्मिक मंत्रालयाने केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी स्पष्टीकरण जारी केले आहे की, बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या चुकीमुळे जास्तीचे पेन्शन पेमेंट वसूल केले जाणार नाही. जर निवृत्तीवेतनधारकाने जाणूनबुजून खोटी माहिती दिली असेल किंवा फसवणूक केली असेल तरच पैसे परत केले जातील.

    Read more

    भारतीय सैन्यदलांचे आधुनिकीकरण, नव्या रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन रचना अस्तित्वात!!

    संपूर्ण जगात भारतीय सैन्य दलाच्या रचनांची वाहवा होत असताना तिच्यामध्ये नव्या युद्धाच्या आव्हानांच्या गरजांनुसार बदल करण्याचे भारतीय संरक्षण दलाने ठरविले असून या बदलांमध्ये अत्याधुनिकता आणि युद्ध परंपरा यांचा अनोखा मिलाफ करायचा निर्णय घेतलाय

    Read more

    Yogi Adityanath : योगी म्हणाले- पप्पू, टप्पू आणि अप्पू ही महाआघाडीची 3 माकडं; त्यांना सत्य दिसतही नाही अन् ऐकूही येत नाही

    बिहारमध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “तुम्ही महात्मा गांधींच्या तीन माकडांबद्दल ऐकले असेल. गांधीजींच्या माकडांनी आपल्याला वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका हे शिकवले. पण आज, इंडी आघाडीकडे आणखी तीन माकडे आहेत: पप्पू, टप्पू आणि अप्पू.”

    Read more

    मुख्यमंत्री फडणवीसांनी घातले मुंबई + ठाणे‌ + पुण्यातल्या प्रकल्पांमध्ये लक्ष, पूर्ण करण्यासाठी वेग आणायचे दिले निर्देश!!

    आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांमध्ये लक्ष घातले. या प्रकल्पांमध्ये नेमके काय अडथळे आहेत

    Read more

    Punjabi Drivers : पंजाबी चालकांशी संबंधित अपघातांनंतर ट्रम्प सरकार कठोर; इंग्लिश स्पीकिंग परीक्षा अनिवार्य, आतापर्यंत 7,000 नापास, परवाने निलंबित

    ड्रायव्हिंग कौशल्याच्या आधारे अमेरिकेत नोकरी शोधणाऱ्या पंजाबी तरुणांवर ट्रम्प सरकारने कडक कारवाई केली आहे. ट्रक चालकांसाठी इंग्रजी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी परीक्षा देखील घेतल्या जात आहेत.

    Read more

    Chinese : चिनी कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी कमी केली; अमेरिकी निर्बंधांच्या भीतीमुळे निर्णय घेतल्याचा दावा

    अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी प्रमुख रशियन तेल कंपन्या आणि त्यांच्या काही ग्राहकांवर निर्बंध लादले आहेत, त्यानंतर आता चिनी तेल कंपन्या रशियन तेल खरेदी करण्यापासून माघार घेत आहेत.

    Read more

    Advocate Asim Sarode : ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द:महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलची मोठी कारवाई; पुढील 3 महिने कोर्टात करता येणार नाही युक्तिवाद

    \
    महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.

    Read more

    Ashish Shelar : ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदारच दिसतात; रोहित पवारांच्या मतदारसंघात 5 हजारांहून अधिक मुस्लिम दुबार मतदार, भाजपचा पलटवार

    मविआकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. तर ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

    Read more

    Nepal : नेपाळमध्ये हिमस्खलन, 7 गिर्यारोहकांचा मृत्यू; 5,630 मीटर उंच शिखरावर अपघात; बेपत्ता लोकांचा शोध सुरू

    सोमवारी ईशान्य नेपाळमधील यालुंग री शिखरावर हिमस्खलन झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ५,६३० मीटर उंचीच्या शिखराच्या बेस कॅम्पवर हिमस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर चार जण बेपत्ता आहेत.

    Read more