पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी; परळी – बीडमध्ये महा पशूधन एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.
चित्रपट बनवण्याच्या नावाखाली 30 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात, बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला. त्या आज तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. तर विक्रम भट्ट यांना दिलासा मिळालेला नाही.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या सरकारने कलैगनार महिला अधिकार योजनेअंतर्गत राज्यातील 1.31 कोटी महिलांच्या बँक खात्यांमध्ये ₹5,000 जमा केले आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका डोळ्याची सुमारे 85% दृष्टी गेली आहे. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या तपासणीत हे उघड झाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद भवन परिसरात देशभरातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी भेट घेतली. या बैठकीत भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्यावर आणि शेतकरी व शेतमजुरांची उपजीविका वाचवण्याच्या गरजेवर चर्चा झाली.
वृत्तसंस्था नवी दिल्लीी : Prime Minister पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता आजपासून बदलला आहे. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ […]
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी विधानसभेत आपले मत मांडले. योगी म्हणाले – प्रत्येक व्यक्ती शंकराचार्य लिहू शकत नाही. कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मी सुद्धा नाही. माझे मत आहे की, भारतातील प्रत्येक व्यक्तीने कायद्याचे पालन केले पाहिजे. जर सपाचे लोक त्यांना पूजणार असतील तर त्यांनी पूजा करावी.
जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची अख्खी बसत नाही मांड तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!, हीच राजकीय वस्तुस्थिती सुनेत्रा पवारांच्या गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय कृती आणि हालचालींमधून समोर आली.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Air India भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक (DGCA) ने एअर इंडियावर 1.10 लाख डॉलर (सुमारे 1 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. […]
रिलायन्स इंडस्ट्रीजला व्हेनेझुएलामधून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडून परवाना मिळाला आहे. सूत्रांनुसार, या मंजुरीनंतर देशातील सर्वात मोठी खासगी रिफायनरी कंपनी आता कोणत्याही मध्यस्थीशिवाय व्हेनेझुएलामधून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करू शकेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज द टाइम्स ग्रुपच्या ‘ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी सांगितले की, आजच्या जगात हे ठरवणे कठीण आहे की तुमचे मित्र कोण आहेत, सहयोगी कोण आहेत, विरोधक किंवा शत्रू कोण आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत जागतिक आर्थिक वाढीचे (ग्लोबल इकोनॉमिक ग्रोथ) नवीन इंजिन बनण्यास सज्ज आहे. ते म्हणाले की, आज जगाच्या एकूण आर्थिक वाढीमध्ये (ग्रोथ) भारताचा वाटा 16% आहे. येत्या काळात भारताचे योगदान आणखी वाढेल. जग आता एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.
संगीतकार आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छलला मोठा दिलासा देत बॉम्बे उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा अंतरिम आदेश पारित केला आहे. न्यायालयाने विज्ञान माने यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी पलाश मुच्छलच्या विरोधात कोणत्याही प्रकारची पुढील टिप्पणी, विधान किंवा प्रकाशन तात्काळ प्रभावाने करू नये.
भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. नवीनतम हेनले पासपोर्ट इंडेक्स (फेब्रुवारी 2026) नुसार, आता भारताचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत 75व्या स्थानावर पोहोचला आहे.
ज्या नरेश अरोरा यांच्यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला, त्याच नरेश अरोरा यांच्या बंधूंना सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार भेटले. पुण्यातल्या सर्किट हाऊस मध्ये त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत वर्तुळात सुनेत्रा पवार विरुद्ध रोहित पवार यांच्यातले राजकीय द्वैत समोर आले.
उच्च न्यायालयाच्या इमारती, राज्यभरातील न्यायमूर्तींची निवासस्थाने आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या सुरक्षा ऑडिटचा तपशील सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस विभागाला दिले आहेत. १७ फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी हा तपशील द्यावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर महत्त्वाची विधाने केली. अजित दादांच्या निधनानंतर पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर तटकरे यांनी “प्रस्ताव आल्यास एकत्रित बसून चर्चा करू’ असे संकेत दिले
नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारपर्यंत सामोपचाराने हा फोटो काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर सेना पदाधिकारी व नगरसेवक परतले.
रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराच्या औचित्यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की ही संस्था आपल्या उद्देशात यशस्वी झालेली नाही. ही पीडितांऐवजी कर्जबुडव्या बिल्डरांना मदत करत आहे.
मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावून माजी आमदारांच्या मुलीने चालवली हिंदू विरोधी “परंपरा”!!, हेच राजकीय वास्तव महापालिकांच्या निवडणुकीनंतर समोर आले.
बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुरुवातीलाच शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षावर निवडणूक लढवायची बंदी घातली त्यानंतर झालेल्या मतदानात तिथली नॅशनलिस्ट पार्टी सत्तेवर आली पण ती पार्टी सत्तेवर येताच त्या पार्टीच्या नेत्यांनी भारताशी पंगा घेतला. शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली.
मुस्लिम संघटना जमीयत उलेमा-ए-हिंदने वंदे मातरमचे सर्व कडवे गाण्यास विरोध केला आहे. संघटनेने म्हटले आहे की, सरकारचा हा आदेश आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे.
भारत सरकारकडून राष्ट्रगीत जन गण मन आधी वंदे मातरम् गाण्यासंबंधी जारी केलेल्या निर्देशांवरून वाद वाढला आहे. या निर्णयावर शीख संघटना दल खालसाने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि याला शीख ओळख व धार्मिक भावनांच्या विरोधात म्हटले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची “चूक” काढताच सुनील तटकरे यांनी गंभीर इशारा दिला. या गंभीर इशार्याचा अर्थ एवढाच की शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणात मोठा खोडा घालून ठेवला.