• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 123 of 1423

    Pravin Wankhade

    Chandrashekhar Bawankule : ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंवर; म्हणाले- कुणाच्याही ताटातील दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही

    मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर, ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा शेतकऱ्यांना कुणबी, म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला असून, जीआरची होळी करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

    Read more

    PM Modi : PM मोदी 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात​​​​​; मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात. तथापि, अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पंतप्रधान मिझोरममध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे.

    Read more

    ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर राज्यात आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!

    ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!, असले राजकारण पश्चिम बंगाल मध्ये घडले. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेल्या बंगाल फाइल्स सिनेमाचा उद्या प्रारंभ होत आहे.

    Read more

    Trump : गाझा ताब्यात घेऊन इमारती विकणार ट्रम्प; दुबईसारखे बनवणार; गाझा सोडण्याच्या बदल्यात पॅलेस्टिनींना 4 लाख आणि 4 वर्षांचे भाडे

    गेल्या २३ महिन्यांपासून इस्रायली हल्ल्यांमुळे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझाला दुबईसारखे पर्यटन आणि आर्थिक स्थळ बनवण्याची योजना समोर आली आहे.

    Read more

    Venezuelan Boat : अमेरिकेचा व्हेनेझुएलाच्या बोटीवर हल्ला, 11 ठार; परराष्ट्र मंत्री म्हणाले- ड्रग्जची तस्करी होत होती, ट्रम्प यांनी आदेश दिले

    मंगळवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या एका बोटीवर हल्ला केला, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी खुलासा केला आहे की ट्रम्प यांनी स्वतः बोटीवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.

    Read more

    Modi : मोदी म्हणाले- काँग्रेस मुलांच्या टॉफीवरही कर लावायचे; लोकांच्या घराचे बजेट बिघडले; दिवाळी- छठपूजेपूर्वी आनंद द्विगुणीत केला

    पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सांगितले की, स्वातंत्र्यानंतरचा आम्ही सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस मुलांच्या टॉफीवरही कर लावत असे. लोकांच्या घराचे बजेट उद्ध्वस्त झाले.

    Read more

    OBC Mahasangh : ओबीसी महासंघाचे नागपूरमधील उपोषण मागे; 14 पैकी 12 मागण्या सरकारकडून मान्य, एका महिन्यात जीआर काढणार

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात पाच दिवसांपासून सुरु असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ओबीसींच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्या असून, या मागण्यांसंदर्भातील शासन आदेश एका महिन्यात काढला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवण्याची घोषणा केली.

    Read more

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा दावा- भाजपने जरांगेंना गंडवले; जरांगेच नव्हे तर उपसमिती, शिंदे समिती, मराठे, कुणबी सर्वांचीच फसवणूक

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मनोज जरांगे यांच्यासह सर्वांनाच गंडवल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे,

    Read more

    Manoj Jarange : कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच- मनोज जरांगे यांचा निर्धार, सातारा गॅझेटिअरवरून सरकारला इशारा

    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजासाठी सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे स्वागत केले आहे. असे असले, तरी मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच त्यांनी सरकारकडे विविध समाजासाठी उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली. ‘कोणी कितीही उपसमित्या केल्या, माझ्याबाबत अफवा पसरवल्या, तरी मराठ्यांना आरक्षण मीच मिळवून देणार,’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

    Read more

    Vinod Patil : मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही; मराठा आंदोलक विनोद पाटील यांचा पुनरुच्चार

    मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही, असा पुनरुच्चार मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. कालच्या जीआरमुळे समाजाला काहीही नवे मिळाले नाही. त्यामुळे मी लवकरच सक्षम वकिलांची फौज घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. मी समाजाचे खच्चीकरण व फसगत अजिबात होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis: मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही; खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरविषयी वेगवेगळे मतमतांतरे व्यक्त केली जात असताना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरसकटचा लाभ देणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी काढलेला जीआर सरसकटचा नाही. या प्रकरणी जे खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. या प्रकरणी कुणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे ते म्हणालेत.

    Read more

    GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली टीका; पंतप्रधान मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST भाराची भूमिका!!

    बहुचर्चित GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली मोदी सरकारवर टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST लादायची भूमिका!!, असे राजकारणात दिल्लीत घडले.

    Read more

    Karnataka : कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने सट्टेबाजीतून कमावले 2000 कोटी; व्हीआयपी सिरीजच्या 5 मर्सिडीज बेंझ जप्त

    कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांनी ऑनलाइन सट्टेबाजीतून अत्यंत कमी वेळात २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी केला. ईडीने गेल्या महिन्यात सिक्कीम येथून वीरेंद्र यांना अटक केली, जिथे ते कॅसिनो भाड्याने घेण्यासाठी गेले होते. ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.

    Read more

    Russia : रशिया भारताला अधिक S-400 संरक्षण प्रणाली देणार; रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले- सहकार्य वाढत आहे

    रशिया आणि भारत यांच्यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. रशियन वृत्तसंस्था टासने एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशिया भारताला एस-४०० चा पुरवठा वाढवण्यास तयार आहे.

    Read more

    Pawan Khera : भाजपने म्हटले- खेडांच्या पत्नीकडेही 2 मतदार कार्ड, तपशील केले शेअर; काँग्रेस नेत्याचे नाव दोन यादीत असल्याचाही दावा

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजप आणि निवडणूक आयोगावर (EC) मत चोरीचा आरोप करत आहेत. दरम्यान, भाजपने बुधवारी दावा केला की काँग्रेस नेते पवन खेडा आणि त्यांच्या पत्नीकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत.

    Read more

    Kavitha : केसीआर यांच्या कन्या कविता यांचा पक्ष-MLC पदाचा राजीनामा; भावांवर पक्ष तोडल्याचा आरोप

    अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली बीआरएसमधून निलंबित केल्यानंतर, बुधवारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती) नेत्या के. कविता यांनी पक्ष आणि एमएलसी पदाचा राजीनामा दिला.

    Read more

    Karnataka High Court : कर्नाटक हायकोर्टाने म्हटले- यूट्यूबवर खोट्या-आक्षेपार्ह बाबींचा प्रसार; हे रोखण्यासाठी मानहानी कायदा पुरेसा नाही

    कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, आजकाल युट्यूबवर खोट्या आणि आक्षेपार्ह गोष्टी इतक्या सहजपणे पसरत आहेत की त्यांना रोखण्यासाठी केवळ मानहानीचा कायदा पुरेसा नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, लोक निर्भयपणे बदनामी करत आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज आहे.

    Read more

    Supreme Court : कायदा बनवण्यात राज्यपालांची भूमिका नाही; बंगाल, तेलंगणा व हिमाचलचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

    विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या संमतीसाठी डेडलाइनची मागणी करणाऱ्या राज्यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सलग सातव्या दिवशी सुनावणी केली. पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशच्या सरकारांनी विधेयके रोखण्याच्या विवेकाधीन अधिकाराला विरोध केला.

    Read more

    Centre Grants : CAA अंतर्गत केंद्राचा निर्णय- पाक-अफगाण-बांगलादेशातून 2024 पर्यंत आलेले अल्पसंख्याक भारतात राहू शकतील

    केंद्र सरकारने बुधवारी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना दिलासा दिला जे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतात आले होते. आता हे निर्वासित (हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन) पासपोर्टशिवाय भारतात राहू शकतील.

    Read more

    GST मधून दिलासा; शेतकरी + महिला + विद्यार्थ्यांना मोठा फायदा!!

    मोदी सरकारने GST (Goods and Sevices Tax) मध्ये आतापर्यंतची सर्वांत मोठी सुधारणा जाहीर करून शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा करवून दिला.

    Read more

    GST तून दिलासा; “या” वस्तूंचा स्वस्ताईचा धमाका!!

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्ली येथे बुधवारी जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीनंतर सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. या बैठकीत टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची सडकून टीका- पवार ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवले!

    मनोज जरांगे यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केल्या असून जरांगे पाटलांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. तसेच मराठा आंदोलक देखील मुंबईतून माघारी फिरत आहेत. अशात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता हल्लाबोल सुरू केला असून पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

    Read more

    Asim Sarode : असीम सरोदेंचा ​​​​​​​सरकारला सवाल- मराठा आरक्षणाचा GR क्लिष्ट, अंमलबजावणीवर शंका!

    मराठा आरक्षणासाठी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या GR वरून आता मराठा समाजात संभ्रमाचे वातावरण आहे. या संदर्भात वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत सरकारला सवाल केले आहे. त्यांनी सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची आणि उपोषण सोडण्यामागील परिस्थितीची सविस्तर माहिती मांडली आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचा सवाल- गुलाल उधळला होता, तर जरांगे पुन्हा मुंबईत का आले? ओबीसींचे आरक्षण वाढवा!

    मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    Vikhe Patil : विनोद पाटलांवर विखे पाटलांचा पलटवार, म्हणाले- चर्चा सुरू होती तेव्हा ताजमध्ये झोपले होते!

    राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत त्यानुसार जीआर देखील काढण्यात आला आहे. परंतु, या जीआरचा टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही मिळणार नसल्याची टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यावेळी बोलताना विखे पाटलांनी विनोद पाटलांवर टीका देखील केली आहे.

    Read more