Pakistan : पाकिस्तान बाॅम्बस्फाेटाने हादरले, खैबर पख्तूनख्वा प्रांतात क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण स्फोट
पाकिस्तान पुन्हा एकदा बाॅम्बस्फाेटाने हादरले असून बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.