जगात काही ठिकाणे अशी असतात की त्यावर चटकन विश्वासच बसणार नाही. नार्दन लाईट हे असेच आगळेवेगळे हॉटेल आहे. मोठ्या जहाजावरील हे हॉटेल उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्यावर तरंगते मात्र याची खासियत आहे ती त्याचे हिलाऴ्यीत. हिवाळा पडला हे हाटेल चक्क बर्फात रुतून बसते. आर्टिक प्रदेशात चोहोबाजूनी वेढलेल्या बर्फात ते स्थिरावते आणि पर्यटकांना पेंग्विन, पोलर बियर पाहण्याची अऩोखी संधी उपलब्ध करुन देते. अशा प्रकारचे हे उल्हाळ्यात तरंगणारे आमि हावळ्यात बर्फाने वेढलेले असे जगातील एकमेव हाटेल असावे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांत चर्चा रंगते. या तरंगणाऱ्या जहाजाला फार मोठा उतिहास आहे. हे जहाज 1910 मध्ये बांधण्यात आले आणि जर्मन नौदलात दाखल झाले. The waves floating in the snow will disappear
दुसऱ्या महायुद्धात ते सहभागीदेखील झाले होते. त्यानंतर 1963 मद्ये ते नौदलात सेवा बजावून निवृत्त झाले. पुढे ते वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जावू लागले, काही काळ या जहाजावर कामगारांचे हास्टेलही होत. मात्र 1991 मध्ये त्याचे हाटेलमध्ये रुपांतर करण्यात आले. आर्टिक सारख्या बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी त्यात बदल करण्यात आले. बाहेरुन संरक्षणासाठीची खास व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून ते धाडसी पर्यटकांना खुणावत आहे. या जहाजावर दहा उबदार, सुसज्ज रुम आहेत. त्यामध्ये वीस प्रवाशांची उत्तम सोय होते. खाली पाण्यात उतरण्यासाठी या जहाजावर दोन खास बोटची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बर्फाळ प्रदेशात असताना खाली प्रवास करण्यासाठी कुत्र्यांच्या स्लेज म्हणजे गाड्याही येथे आहेत. त्यासाटी या जहाजावर खास प्रशिक्षित कुत्री ठेवण्यात आलेली आहेत.
उन्हाळ्यात हे जहाज पर्यटकांना नार्वेच्या सुमद्रातील पर्यटनस्थळांच्या सफरी घडवते. हिवाळा सुरु होण्यापूर्वी हे जहाज आर्टिक प्रदेशातील टेंपलजार्दन येथे नांगरण्यात येते. या ठिकामी दरवर्, हिवळ्यात समुद्र गोठतो. आजूबाजूचे पाणी गोठण्यासाठी साधारणपणे महिन्याचा कालावधी लागतो. त्यावेळी जहाजावरील खलाशी योग्य पद्धतीने ती बर्फात अडकून बसेल तसचे जहाजाची मोडतोड होणार नाही याची काळजी घेतात. एकदा का तू बर्फात अडकली की त्यावर पर्यटक येवू लागतात. पर्यटांना या अनोख्या हाटेलपर्यंत जाण्यासाठी बरीच कसरत करवी लागते. लांगयेर्बन या साठ किलोमीटर अंतरावरून पर्यटक स्नोमोबाईल किंवा कुत्र्यांच्या बग्गीतून येथे येतात. जहाजावर राहणे म्हणजे त्यांच्यासाठी अलौकिक अनुभव असतो. या काळात त्यांना आर्टिक प्रदेशातील प्राणीजीवन पाहता येते. पेंग्विन, वालरस ,सील, कोल्हे, पक्षी, पोलर बियर यांचे अनोखे दर्शन घेण्याची संधी पर्यटकांना लाभते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App