नाशिक : भाजपवाल्यांना त्यांचा डीएनए विरोधकांचा वाटतो पण सत्तेवर राहण्यात मोदींनी मात्र पहिला नंबर पटकावला.
भाजपवर सत्तापिपासून असल्याची टीका झाली की आतापर्यंत आणि एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपचा डीएनए विरोधकांचा असल्याचे सांगितले. आम्हाला कधी सत्तेची सवय नव्हती. पण काँग्रेसवाले किंवा राष्ट्रवादीवाले सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर नसले की त्यांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडणारी होते असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेकदा दिले. पण असल्यावर वक्तव्यांमधून आपण अप्रत्यक्षपणे काँग्रेसवाल्यांना आणि राष्ट्रवादीवाल्यांना सत्तेचे मक्तेदार बनवलेय. त्यातूनच त्यांना सत्तेचा माज चढलाय, हे हे राजकीय सत्य फडणवीस आणि चंद्रकांतदादांच्या लक्षातही आले नाही.
पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र केवळ दीर्घकाळ सत्तेवर राहणारे नेते नाहीत, तर भारतातला सत्तेवर राहायचा विक्रम सुद्धा त्यांनी मोडीत काढला. मोदी 24 वर्षे 165 दिवसांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहिले आणि त्या अजूनही पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. मोदी 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावर सलग 12 वर्षे 227 दिवस काम केले. त्यानंतर ते पंतप्रधान बनले. मोदी 26 मे 2014 पासून देशाचे पंतप्रधान आहेत. याचा अर्थ मोदी 24 वर्षे 165 दिवसांपेक्षा जास्त काळ सत्तेवर राहिलेले एकमेव नेते आहेत.
– मोदींच्या आधी सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग हे सलग 24 वर्षे 165 दिवस सत्तेवर राहिले.
– ज्योती बसू हे 23 वर्षे 137 दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर होते.
– पंडित नेहरू हे सलग 16 वर्षे 286 दिवस भारताच्या पंतप्रधान पदावर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व नेत्यांवर मात करून ते 24 वर्षे 165 दिवसांपेक्षा जास्त काळ सत्तेवर राहिलेत. तरी भाजपच्या नेत्यांचा आपला डीएनए विरोधकांचा असल्याचा गैरसमज दूर झालेला दिसत नाही. (त्यामुळेच ते आपण सत्तेवरच राहण्यासाठी जन्माला आलोय हा काँग्रेस वाल्यांचा आणि राष्ट्रवादीवाल्यांचा माझ सुद्धा दूर करत नाहीत.)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App