मनी लँडिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कायदेशीर कारवाईचे संकट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांना पत्र लिहून त्यांनी केंद्रीय तपास संस्थांवर आरोपांच्या एकापाठोपाठ एक फैरी झाडल्या आहेत. पण यातला राजकीय क्लायमॅक्स या पत्रापलिकडचा आहे…!! Mumbai’s godfather Shiv Sena, Raut’s next press conference in front of ED’s office; But will Pawar let “this” happen ??
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर आरोपांच्या तोफा डागल्या आहेत, पण त्याच वेळी त्यांनी दोन विधाने अशी केली आहेत, की ज्याविषयी राजकीय शंका घ्यायला नक्की वाव आहे. “आमच्यावर दादागिरी करता काय? ही मुंबई आहे आणि मुंबईत शिवसेनाच दादा आहे!!”, असे विधान राऊत यांनी केले आहे आणि त्यापुढे जाऊन त्यांनी पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आणि त्या पुढची पत्रकार परिषद ही ईडीच्या मुंबईतल्या कार्यालयासमोर घेणार, तेव्हा बघा काय घडते ते!! असा इशाराही दिला आहे. आणि नेमक्या या विधानांमध्ये संजय राऊत यांच्या राजकीय कृतीची मेख दडली आहे…!!
संजय राऊतांनी ईडीच्या कार्यालयासमोर जाऊन पत्रकार परिषद घेणे हे सरळ – सरळ शरद पवार यांच्या 2019 मधल्या ईडीच्या न आलेल्या नोटिशी वरून केलेल्या राजकीय नाट्याचे रिपिटेशन ठरणार आहे!! शरद पवारांना त्यावेळी राज्य सहकारी शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची नोटीस आलेली नव्हती. ईडीची नोटीस आल्याच्या फक्त बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. पण त्यावरून शरद पवार यांनी आपणच ईडीच्या चौकशीला सामोरे जातो असे सांगून मोठे राजकीय नाट्य घडविले होते. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय नौका 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कशीबशी तरली!!
संजय राऊत हे पुढची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेऊन शरद पवार यांच्या राजकीय नाट्याचे रिपिटेशन घडवू पाहत आहेत… पण हे शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला चालेल काय?? हाच खरा प्रश्न आहे. याही पलिकडे जाऊन “मुंबईत शिवसेनाच दादा ठरली, तर ते देखील शरद पवार यांना चालेल का?? शिवसेनेची मुंबईतली टिकलेली अथवा वाढलेली ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या “राजकीय तब्येतीसाठी” हितावह ठरेल का?? हा खरा प्रश्न आहे!!
गेल्या काही महिन्यांतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकूण राजकीय हालचाली लक्षात घेतल्या, तर मुंबईतली शिवसेनेची ताकद क्षीण करणे हा दोन्ही पक्षांचा समान राजकीय उद्देश राहिला आहे. अशा स्थितीत संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने आपणच घडविलेल्या राजकीय नाट्याचे रिपिटेशन करणे हे शरद पवार घडू देतील का??, हा ही तितकाच कळीचा प्रश्न आहे. भाजप विरोधात जोरदार आघाडी उघडणे ही शिवसेनेची मुंबईतली मोठी राजकीय गरज आहेच, पण त्यानिमित्ताने भाजप आणि शिवसेना या दोनच पक्षात जर प्रचंड घमासान झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था तिथे खिजगणतीतले पक्ष म्हणून उरणार नाही. अशा स्थितीत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई पट्ट्यात नगण्य उरली, तर ते पवारांना पचनी पडेल का?? हा ही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे!!
म्हणूनच वर उल्लेख केलेला “मुंबईची दादा शिवसेना” राहणे आणि संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या “ईडी राजकीय नाट्याचे” रिपिटेशन करणे हे शरद पवार घडू देतील का…?? याविषयी ठळक प्रश्नचिन्ह आहे…!!
Mumbai’s godfather Shiv Sena, Raut’s next press conference in front of ED’s office; But will Pawar let “this” happen ??
महत्त्वाच्या बातम्या
- तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
- समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावत ममता बॅनर्जी यांची उत्तर प्रदेशातही खेला होबेची घोषणा
- लाच घेतल्याचे निर्लज्ज समर्थन, म्हणे मंदिरात कोणी प्रसाद घेऊन आले असेल तर नाही कसं म्हणणार
- कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री चिंतेत, धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य न करण्याचे आवाहन
- पोलीसांकडून आरोपी पाठराखण होत असल्याने शेतकऱ्याच्या मुली संतप्त, धनंजय मुंडे यांची गाडी अडवून विचारला जाब