काल रात्री मोदी + शाह + नड्डांचा सुरू होता खलबतखाना; ठाकरे पोहोचले होते प्री-वेडिंग फंक्शनला!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसांवर आले असताना इकडे राजधानी नवी दिल्लीत मोदी + शाह + नड्डा यांचा सुरू होता खलबतखाना, पण त्याचवेळी उद्धव ठाकरे पोचले होते, फ्री वेडिंग फंक्शनला!! Modi + Shah + Nadda prepared 180 candidate final list, thackeray – pawar preparing for pre wedding function and lunch in different programs

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासह भाजपच्या अति वरिष्ठ नेत्यांची पहाटे 3.30 पर्यंत चर्चा केली. यामध्ये भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यामध्ये 180 पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यात फार मोठे फेरबदलही करून घेतले.

पण एकीकडे मोदी शाह आणि नंतर असे लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या खलबत खान्यात गुंतले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा लटकवत ठेवून उद्धव ठाकरे अनंता अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतून जामनगरला पोहोचले. यावेळी त्यांच्यासमवेत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते.

दुसरीकडे बारामतीत शरद पवार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना मेजवानी देण्याच्या तयारीला लागले होते. बारामतीत आपली गाडी साईडला पटल्यानंतर ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी पवारांचे हे प्रयत्न चालू होते आणि त्याचवेळी महाविकास आघाडीत चर्चा वाटप खूप समाधानकारक चालू आहे वेगवेगळ्या प्रस्तावांवर चर्चा होत आहे असे संजय राऊत जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले माध्यमांना सांगत होते. हे सगळे काल रात्रीच्या आसपास घडत होते.

एकीकडे मोदी शाह आणि नड्डा भाजपची रणनीती ठरवून तब्बल 180 उमेदवारांची यादी वन स्ट्रोक फायनल करतात आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतले नेते बडे नेते वेगवेगळ्या भोजनांच्या तयारीत लागलेले दिसतात. त्यांच्या दुसऱ्या फळीतले नेते पत्रकारांसमोर येऊन महाविकास आघाडीतले जागावाटप समाधानकारक सुरू असल्याचे सांगतात. हा विरोधाभास काल रात्री समोर आला.

Modi + Shah + Nadda prepared 180 candidate final list, thackeray – pawar preparing for pre wedding function and lunch in different programs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात