• Download App
    आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भावनांना महत्त्वाचे स्थान play a vital role in making important decisions in life

    मेंदूचा शोध व बोध : आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भावनांना महत्त्वाचे स्थान

    भावभावनांविषयीची जाणीव आजमितीइतकी पूर्वी कधीही नव्हती. यापूर्वी तर भावना दाबून ठेवणे हा गुणधर्म मानला गेला. आज लोकांच्या भावनिक अडचणींकडे सहानुभूतीने पाहिले जाते; तसेच तुमच्या भावना व्यक्त. करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.Emotions play a vital role in making important decisions in life

    आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भावनांचे महत्त्व आजइतके पूर्वी कधीच डोळसपणे पाहिले गेले नाही. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ती कशी ओळखावी, याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. याच भावनिक बुद्धिमत्तेमुळे आयुष्यातील विविध समस्यांवर आपण मात करू शकतो. मानसिक ताणतणाव हा मोडलेल्या हाडा इतका किंवा त्याहूनही भयानक असू शकतो याबद्दल आज दुमत नाही.

    आजच्या काळातील मानसशास्त्रातील संशोधन पूर्वी उपलब्ध नव्हते. मानवी मनोव्यापाराबद्दलची जिज्ञासा या संशोधनांच्या मुळाशी होती. सिग्मंड फ्रॉइड यांनी सर्वप्रथम मानवी मन आणि त्याला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी या संबंधात सिद्धांत मांडले. त्यानंतरही अनेक सिद्धांत मांडले गेले; पण मूळ उद्देश अर्थातच लोकांच्या मानसिक यातना कमी करणे हा होता.

    भावनिक स्वास्थ्य विषयी बोलताना 8 पासून 0 पर्यंतची अवस्था मनस्वास्थ्य कमी असणारी तर 0 पासून 8 पर्यंत चांगले मनस्वास्थ्य असणारी अशी मोजपट्टीही सांगितली गेली. नंतरच्या काळात फक्त अस्वस्थता दूर करणे एवढाच उद्देश न ठेवता एरिक्सीन बॅंडर आणि ग्राईंउर यांनी 0 पाशी न थांबता 4, 5, 6, 7 अशी स्थिती मिळवण्यावर भर दिला. 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी यामध्ये मानवी जीवनातील व्यावसायिक यश व वैयक्ति.क सुख यासाठी आवश्यनक असे काही घटक मांडले. या घटकांचा एकत्रितपणे विचार म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता.

    भावनिक बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता गुणांक यातील फरक समजून घ्यायला हवा. बुद्धिमत्ता गुणांक चाचण्या सुमारे शंभर वर्षांपासून बुद्धिमापन चाचण्या म्हणून वापरल्या जात आहेत. या संदर्भाने बुद्धिमत्ता म्हणजे तर्कसुसंगतता क्षमता, विश्लेवषणात्मक विचार चाचण्या, भाषिक कौशल्य, इतर चाचण्या. या चाचण्या आपल्या मेंदूची वस्तुनिष्ठ माहिती संदर्भातील आकलन साठवून ठेवण्याची क्षमता व स्मरण याबद्दलची पडताळणी करतात.

    Emotions play a vital role in making important decisions in life

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!