यूपीत शिवसेनेच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी “निवडला” नवाब मलिकांचा ईडी कोठडीचा “मुहूर्त”!!

नाशिक : आदित्य ठाकरे आज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात झेप घेतली आहे. ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. याआधी त्यांनी महाराष्ट्राबाहेर गोव्यात जाऊन प्रचार केला आहे. पण गोवा नाही म्हटले तरी मराठी आणि लहान राज्य. पण उत्तर प्रदेशाचे तसे नाही. दिल्लीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो असे सामनाकार कितीही म्हणत असले तरी दिल्लीचा खरा राजकीय रस्ता उत्तर प्रदेशातून जातो ही वस्तुस्थिती आहे. त्या उत्तर प्रदेश मध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून प्रथमच हल्लाबोल केला आहे आणि हा हल्लाबोल फार महत्त्वाचा आहे. यासाठी आदित्य ठाकरे यांनी निवडलेला “मुहूर्त” तर खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे…!! Aditya Thackeray “chose” Nawab Malik’s ED cell “moment” for Shiv Sena’s campaign in UP !!

इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक हे थेट दाऊद इब्राहिमशी मनी लॉन्ड्रिंग केलेल्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत पोहोचले आहेत आणि नेमका हाच “सुयोग्य मुहूर्त” साधत आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशाकडे कूच केले आहे.



या दौऱ्यात त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील आहेत. म्हणजे एकीकडे नवाब मलिक ईडीच्या कोठडीत, महाविकास आघाडी मधले काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलनात आणि आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मात्र उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या प्रचारात…!! हा “राजकीय दुग्धशर्करा योग” कदाचित अन्य कोणाच्याही नशिबी आला नसता… तो आदित्य ठाकरे यांच्या नशिबी आला आहे आणि नशिबाची ही साथ पाहून आदित्य ठाकरे यांनी नवाब मलिक समर्थनार्थ आंदोलनात न उतरता थेट उत्तर प्रदेश गाठले आहे…!!

आता महाविकास आघाडीच्या आंदोलनात शिवसेनेचे मंत्री सामील झाले नाहीत, अशी हाकाटी मराठी माध्यमांनी किती पिटली तरी शिवसेनेला यातून फरक पडत नाही हेच यातून दिसून आले. संजय राऊत हे कालपर्यंत…खरे बोलायचे म्हणजे तर काल रात्री पर्यंत नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी जोरजोरात माध्यमांत पुढे येत होते. नवाब मलिक यांचा कोणत्याही परिस्थितीत राजीनामा घेतला जाता कामा नये, असे ठणकावून सांगत होते पण मीडिया समोरून ते बाजूला जातात आज सकाळीच ते आदित्य ठाकरे यांच्यासमवेत उत्तर प्रदेशला जाऊन पोहोचले. जणू काही नवाब मलिक, त्यांची इडी कोठडी, दाऊद इब्राहिमशी त्यांचे असलेले व्यवहार यांच्याशी शिवसेनेचा काही संबंधच नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना त्याचे काही देणे घेणे नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

या अर्थाने आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या प्रचारासाठी “उत्तम मुहूर्त” साधला हेच कळून येते. शिवाय दाऊद इब्राहिमशी संबंधांमध्ये नवाब मलिक अडकले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाचा प्रचाराला उत्तर प्रदेशात जोरदार धार आली तर कोणाला आश्चर्य वाटायला नको…!!

Aditya Thackeray “chose” Nawab Malik’s ED cell “moment” for Shiv Sena’s campaign in UP !!

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात