घरातील लहान मुले इतके प्रश्ना विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्ना आवर असं म्हणावंसं वाटतं. हे काय आहे? हा प्रश्ना प्रत्येक लहान मुलाला सारखाच पडत असतो, कारण असंख्य नव्या वस्तू त्याला दिसत असतात. त्या वस्तूंची, अवतीभवतीच्या जगाची ते माहिती करून घेत असतं. हे खरंय की एकच प्रश्नय ते पुनःपुन्हा विचारतं. तो त्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असतो, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. मुलं सतत प्रश्न् विचारून भंडावतात ती पालकांना त्रास देण्यासाठी नव्हे, ते त्याच्या मेंदचं शिकणं असतं. त्यांच्या मेंदूची एकप्रकारे यातून मशागत होत असते. The real training of children’s brains comes from the questions asked to parents
तेव्हा मुलांनी शिकावं असं वाटत असल्यास पालकांनी त्यांच्या प्रश्नांएना उत्तरं देणं, तीही न कंटाळता अपरिहार्य ठरतं. शिकण्यात प्रश्नांतचं महत्त्व अफाट असतं. सफरचंद खाली का पडतं या जगप्रसिद्ध प्रश्नायचं उत्तर शोधतानाच न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता. तुमचं मूलही तसं करू शकतं. त्यामुळे त्याच्या एखाद्या अवघड प्रश्नाशचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही, तरी हरकत नाही. असा प्रश्ने विचारल्याबद्दल तुम्ही त्याचं कौतुक करू शकता. त्यालाच विचार करायला, उत्तर शोधायला उद्युक्त करू शकता. त्याच्यासोबत तुम्हीही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकता. मात्र ज्या प्रश्नां ची उत्तरं तुम्ही देऊ शकता, ती आवर्जून द्या.
आपल्या प्रश्नां्ची उत्तरं पालकांकडं मिळतात, हा विश्वाहस वाटल्यास मुलं पुढंही सर्व बाबतीत मनमोकळेपणानं बोलत राहतील. तुमच्याकडं त्यांच्या प्रश्नां ना वेळ नाही, असं त्यांना वाटल्यास त्यांचे प्रश्न्, मनातलं कुतूहल विरत जाईल. प्रश्न् पडायचेच बंद होतील. म्हणूनच सारखे कसले रे प्रश्न् विचारत असतोस, ही प्रतिक्रिया टाळा. कसले रे मूर्खासारखे प्रश्नर विचारतोस हे म्हणण्याचं मोह तर कटाक्षाने टाळा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App