नाशिक : काँग्रेसच्या स्थापनेच्या वर्धापन दिनी नवी दिल्लीतील अकबर रोड वरील काँग्रेस मुख्यालयात झेंडा फडकवताना पडला, तो काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झेलून तो दोन्ही हातात धरून फडकावला. या घटनेची चर्चा सोशल मीडियामध्ये जोरदार झाली. Discussion that the flag of Congress fell, but after 60 years, the Gandhi family remembered the Shastri family, why is there no discussion about it ??
पण काँग्रेसचाच स्थापना दिनाचे निमित्त साधून एक महत्वाची भेट जवळजवळ 50 -60 वर्षानंतर घडली, त्याची मात्र चर्चा कुठे सोशल मीडिया फारशी दिसली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेस स्थापना दिवसाचे निमित्त साधून दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री यांची भेट घेतली. या भेटी संदर्भातले ट्विट स्वतः प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केले. काँग्रेसचा स्थापना दिवसाइतका दुसरा कोणता दिवस चांगला असेल, ज्या दिवशी मी दिवंगत माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, असे प्रियंका गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. गांधी आणि शास्त्री घराण्याच्या पुढच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याचा सूतोवाच देखील प्रियांका गांधी यांनी केले आहे.
कांग्रेस स्थापना दिवस से बेहतर क्या मौका हो सकता था कि कांग्रेस के सिपाही व भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री जी के बेटे श्री सुनील शास्त्री जी से सप्रेम भेंट कर तमाम विषयों पर चर्चा की। देश के लिए मिलकर लड़ेंगे, जीतेंगे pic.twitter.com/NKZBaFokXK — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 28, 2021
कांग्रेस स्थापना दिवस से बेहतर क्या मौका हो सकता था कि कांग्रेस के सिपाही व भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री जी के बेटे श्री सुनील शास्त्री जी से सप्रेम भेंट कर तमाम विषयों पर चर्चा की।
देश के लिए मिलकर लड़ेंगे, जीतेंगे pic.twitter.com/NKZBaFokXK
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 28, 2021
या राजकीय भेटीचा सध्याच्या राजकारणावर किती परिणाम होतील याविषयी जरी शंका असली तरी मूळातच गांधी परिवारातील व्यक्ती आणि शास्त्रीय परिवारातील व्यक्ती काँग्रेसचा स्थापना दिनाच्या दिवशी भेटणे किंवा प्रियांका गांधी यांनी पुढाकार घेऊन शास्त्री घराण्यातील व्यक्तीला भेटणे याचे राजकीय महत्त्व काँग्रेससाठी वेगळे आहे. लालबहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शास्त्री घराणे त्यानंतर राजकीय दृष्ट्या जवळजवळ अस्तंगत झाल्या जमा होते. अधून मधून सुनील शास्त्री आणि अनिल शास्त्री यांच्या बातम्या येत असत. परंतु त्या बातम्यांना प्रसा रमाध्यमांमध्ये फारसे महत्त्व नसे.
मात्र ताश्कंद फाईल्स चित्रपट आल्यानंतर शास्त्रीजींच्या गूढ मृत्यूविषयी पुन्हा देशव्यापी चर्चा सुरू झाली. काँग्रेसमध्ये नेहरु – गांधी परिवार वगळून बाकी सर्व महत्त्वाच्या नेत्यांना डावलण्यात आल्याची भावना देशभरात बळावत चालली. असे असताना प्रियांका गांधी यांनी लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री यांची भेट घेणे त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणे आणि त्या भेटीचा फोटो आवर्जून ट्विट करणे याला काँग्रेसच्या राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
त्याचबरोबर काँग्रेस रसातळाला चाललेली असताना गांधी घराण्याच्या नेतृत्वाला ग्रहण लागलेले असताना इतक्या वर्षांनी गांधी घराण्यातील कोणत्या नेत्याला शास्त्री घराण्याची आठवण झाली का? किंवा शास्त्री घराण्यातील कोणा व्यक्तीला भेटण्या विषयी कळवळा वाटला का? याचे नेमके राजकीय रहस्य काय? याची देखील चर्चा या निमित्ताने घडताना दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App