वृत्तसंस्था
मुंबई : आरटीओत वाहन चाचणी न देताच चालकाला लायसन्स मिळणे शक्य होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत अधिसूचना काढली आहे. Rto Driver License Establishment Of Updated Driver Training Center By The Ministry Of Road Transport
एखादी संस्था, कंपनी, कंत्राटदारांना नवीन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. यामधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या चालकाला प्रमाणपत्र मिळेल आणि ते सादर केल्यानंतर आरटीओकडून थेट लायसन्स मिळणार आहे. कुशल वाहनचालक मिळावेत आणि अपघातही कमी व्हावे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
सध्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चालकाला २१ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यातून बाहेर पडलेला चालक आरटीओत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करतो. त्यानंतर सर्व कागदपत्र पूर्ततेनंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेतली जाते व त्यानंतर लायसन्स मिळते. पक्के लायसन्स मिळवण्याआधी शिकाऊ लायसन्स गरजेचे असते. परंतु यातून कु शल चालक मिळतीलच, असे नाही.
त्यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाने अद्ययावत असे चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याची मसुदा अधिसूचना फे ब्रुवारी २०२० मध्ये जारी के ली होती. त्याची अंतिम अधिसूचना ७ जून २०२१ ला रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केली आहे. अद्ययावत चालक प्रशिक्षण केंद्र उभे राहिल्यानंतर आरटीओकडील अधिकार मात्र कमी होणार आहेत. आरटीओकडून फक्त चालकाला कायमस्वरुपी लायसन्स देण्याचा अधिकार राहिल. वाहन चाचणी घेता येणार नाही.
केंद्रासाठीच्या अटी…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App