विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!

devedra fadanvis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक झाली.Transformation of ST in developed Maharashtra; Resolution to convert all buses into 100% e-buses!!

विकसित महाराष्ट्र योजनेअंतर्गत एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50 %, 2035 पर्यंत 80 % तर 2047 पर्यंत एसटीचा 100 % ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



– बसगाड्यांकरता इकोसिस्टीम

पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील 7 दिवसात निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक इकोसिस्टिम तयार करावी, तसेच ज्या मार्गाने खासगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

– ई बसगाड्यांना अनुदान

राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई-बसेसना बसच्या किंमतीच्या 10 % किंवा कमाल 20 लाख रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5150 ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Transformation of ST in developed Maharashtra; Resolution to convert all buses into 100% e-buses!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात