राहुल गांधींनी लिहिले, भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!; पण लाडक्या बहिणींचा कसा आणि कुठे बसेल फटका??

modi rahul

नाशिक : लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा परिसीमन विधेयके पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी हर्षवायू झाल्यासारखे लिहिले भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!, राहुल गांधींच्या या लिहिण्यामुळेच लाडक्या बहिणी कसा आणि कुठे देतील फटका??, असा सवाल ताबडतोब समोर आला.Congress and opposition will feel the heat of Indian women

लोकसभेत मोदी सरकारने मांडलेली महिला आरक्षण आणि लोकसभा विधानसभा परिसीमन विधेयके काँग्रेसच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीने फेटाळल्यानंतर राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना तुफान आनंद झाला. राहुल गांधींच्या पाठोपाठ स्टालिन यांनी आता तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम २०० जागा जिंकण्याची बात मारली.

पण राहुल गांधी आणि स्टालिन यांनीच मारलेल्या बातांमुळे लाडक्या बहिणी कसा आणि कुठे देतील फटका??, असा सवाल समोर आला.



– लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठे यश

लोकसभेची निवडणूक होऊन सुमारे दोनच वर्षे झालीत. त्या निवडणुकीत विरोधकांनी घटना बदलायचे ना रेटिंग चालवून मोदी सरकारला फटका दिला होता. मोदींनी दिलेल्या अबकी बार 400 पार या घोषणेला विरोधकांनी छेद देत मोदींच्या भाजपला 240 वर आणून ठेवले होते. स्वतः मोदींसाठी आणि सरकारसाठी हा फार मोठा फटका होता. पण त्यातून हातपाय गाळून न बसता मोदी सरकारने आणि भाजपने पुढच्या सगळ्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी एक जबरदस्त खेळी केली होती. ती अजून पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभेत सुद्धा खेळली गेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकीत भाजपने लाडक्या बहिणींना खुश करण्याचा डाव खेळला होता. तो डाव एवढा सफल झाला की काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना लोकसभेत मिळालेले भरघोस यश अवघ्या सहा महिन्यांसाठी सुद्धा टिकवून धरता आले होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियाणात काँग्रेसला अनुक्रमे 14 आणि पाच जागा मिळाल्या होत्या म्हणजेच दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला निम्मे यश मिळाले होते. महाराष्ट्रात तर काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना मिळून 31 खासदार निवडून आणता आले होते.

– पण विधानसभांमध्ये लाडक्या बहिणींनी दिला फटका

पण विधानसभा निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी भाजपला एवढे प्रचंड यश मिळवून दिले की त्यात काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष अक्षरशः वाहून गेले.

– विरोधकांनी काढून घेतला स्वतःच्या पायावर धोंडा

लोकसभेत मोदी सरकारने आणलेली महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा परिसीमन विधेयके नामंजूर करून काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी आपल्या पायावर स्वतःहून राजकीय धोंडा पाडून घेतलाय. कारण या विधेयकांच्या पराभवाच्या निमित्ताने त्यांनी मोदी सरकारच्या हातात आयता मुद्दा दिलाय. याचा परिणाम पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांवर झाल्याशिवाय राहणार नाही कारण तिथे आता मोदी आणि भाजपचे बाकीचे नेते उरलेल्या दिवसांमध्ये अक्षरशः राजकीय धुमाकूळ घालतील. मोदी आणि भाजपचे नेते प्रत्येक भाषणामध्ये काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांना थेट महिला विरोधी ठरवून त्यांच्यावर कायमचा महिला विरोधाचा ठपका मारतील. काँग्रेस आणि विरोधकांच्या हातात सत्ता दिली, तर लाडक्या बहिणींना महिलांना आरक्षण कधीच मिळणार नाही, कारण महिलांना सत्तेमध्ये वाटा देण्याची त्यांची प्रवृत्तीच नाही, असा प्रचार करण्याची संधी मोदी आणि भाजपचे नेते बिलकुल सोडणार नाहीत.

– मोदींना विरोधकांनी दिली आयती संधी

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकाच काय पण बाकी पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये मोदी आणि भाजपचे नेते महिला आरक्षणाचाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवतील. घराणेशाहीच्या पक्षांमुळे महिला आरक्षण आणि लोकसभा विधानसभा मध्ये वाढीव सदस्य संख्या मिळू शकली नाही. त्यांना जबर शिक्षा केल्याशिवाय महिलांना आरक्षण मिळणार नाही, असा प्रचार करायला मोदी आणि भाजपचे नेते मोकळे होतील. किंबहुना त्यांनी तोच “डाव” खेळून दोन्ही विधेयके लोकसभेत आणली होती. काँग्रेस आणि विरोधकांनी ती विधेयके फेटाळून लावल्याने मोदी आणि भाजपच्या नेत्यांना तुफानी संधी आयती हाती आली आहे. त्यामुळे मोदींचा पुढच्या निवडणुकीतला नारा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन तृतीयांश बहुमत किंबहुना तीन चतुर्थांश बहुमत असाच राहणार आहे. त्या उलट काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांना आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, असा शंख करत फिरावे लागणार आहे.

Congress and opposition will feel the heat of Indian women

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात