विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला असला तरी यातली पाकिस्तानची मध्यस्थी फक्त नावापुरतीच, खरी स्क्रिप्ट अमेरिकेचीच!!, हेच राजकीय वास्तव पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका मोठ्या डिजिटल चुकीमुळे समोर आले. त्यामुळे ते ट्रोल झाले. युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी शरीफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती, ज्याच्या सुरुवातीला चुकून मजकुराचे स्वरूप दर्शवणारा ‘Draft’ हा शब्द राहिल्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.Prime Minister
नेमका वाद काय?
शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला दिलेली मुदत वाढवण्याची आणि शांततेसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. मात्र, हे ट्विट पोस्ट करताना त्याच्या सर्वात वरच्या भागात असे लिहिले होते की,”Draft – Message from the Prime Minister of Pakistan on X.”
या एका ओळीमुळे सोशल मीडियावर युजर्सनी संशय व्यक्त केला. सामान्यतः पंतप्रधानांची टीम ड्राफ्ट तयार करताना ‘पंतप्रधानांचा संदेश’ असे लिहिते, मात्र त्यात ‘पाकिस्तानचे पंतप्रधान’ असा उल्लेख असल्याने हा मजकूर बाहेरून, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून पाठवण्यात आला असावा, असा तर्क लावला.
घाईघाईत ट्विट ‘एडिट’
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) हे ट्विट त्वरित एडिट करून त्यातील ‘ड्राफ्ट’ हा शब्द हटविला. मात्र, तोपर्यंत नेटकऱ्यांनी याचे स्क्रीनशॉट्स काढून ते व्हायरल केले होते. मात्र अनेक युजर्सनी सवाल केला की, “आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचे नाव ड्राफ्टमध्ये कोण लिहितं? हे स्पष्टपणे अमेरिकेकडून आलेली ‘स्क्रिप्ट’ वाटत आहे.” या चुकीमुळे पाकिस्तानची मध्यस्थी ही केवळ नावापुरती असून पडद्यामागून सूत्रे अमेरिका हलवत असल्याचे चित्र निर्माण झाले.
शहबाज शरीफ यांच्या ट्विटमधील मजकूर
ट्विटमध्ये शरीफ यांनी म्हटले की, मध्य पूर्वेतील युद्ध शांततेने सोडवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती करतो की त्यांनी चर्चेसाठी 2 आठवड्यांची मुदत वाढवावी. आम्ही आमच्या इराणी बांधवांना विनंती करतो की त्यांनी सदिच्छा म्हणून 2 आठवड्यांसाठी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करावी. दीर्घकालीन शांततेसाठी सर्व युद्धखोर पक्षांनी किमान 2 आठवड्यांचा युद्धविराम पाळावा.
विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही वेळातच दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला. इराणने याला आपला “विजय” म्हटले, तर पाकिस्तानने या यशाचे श्रेय घेण्याचे ढोल पिटले. मात्र, या Draft या एका शब्दामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थीची पुरती पोलखोल झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App