वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Pakistan-Afghan मध्य-पूर्वेतील युद्धासोबतच भारताचे शेजारी देशही वाढत्या लष्करी तणावाचा सामना करत आहेत. एकीकडे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर हवाई हल्ले आणि गोळीबारा मुळे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पूर्व आशियात चीनने नवीन आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ३१ मार्चपासून होणारी बीजिंग भेट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.Pakistan-Afghan
गेल्या ४८ तासांत तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनच्या २६ हून अधिक लष्करी विमानांनी गस्त घातली आहे.. तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानुसार, २५ फेब्रुवारीनंतर चिनी लढाऊ विमानांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. चीनच्या धमक्या पाहता तैवानही बचावाच्या तयारीत आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष विल्यम लाय यांनी ४० अब्ज डॉलरच्या विशेष संरक्षण बजेटचा प्रस्ताव मांडला आहे. इतकेच नाही तर संपूर्ण देशातील बहुमजिली इमारतींमध्ये ‘एअर डिफेन्स शेल्टर’ची व्यवस्था केली जात आहे. हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तैवान इस्रायलच्या ‘आयर्न डोम’प्रमाणे राजधानीभोवती ‘टी-डोम’ची रचना करत आहे. तैवानच्या तयारीबाबत तैपेईमधील ‘सिव्हिल डिफेन्स एज्युकेशन असोसिएशन’च्या डॉ. वेन लियू यांनी सांगितले की, कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सैनिकाची भूमिका बजवावी.Pakistan-Afghan
संघर्ष वाढला तर परिणाम संपूर्ण आशियावर
रणनीतिक विश्लेषकांनुसार, आशियातील विविध भागांत निर्माण होत असलेला हा तणाव थेट एकमेकांशी जोडलेला नसला तरी, त्याचा परिणाम संपूर्ण क्षेत्राच्या सुरक्षा व्यवस्थेवर होत आहे. सीमावाद, सागरी दावे व लष्करी युती यामुळे अनेक शेजारी देश एकाच वेळी दबावाखाली दिसत आहेत. एखाद्या भागात संघर्ष वाढला, तर त्याचा परिणाम आशियावर होऊ शकतो.
जपानची घोषणा : तैवानवर हल्ला झाल्यास मदत करणार, चीन संतप्त
तैवानशी संबंधित अन्य एका घडामोडीत जपानच्या पंतप्रधान सना ताकाइची पुढच्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. तैवानवरील कोणताही धोका जपान स्वतःवर झालेला हल्ला मानले आणि तैवानला पूर्ण मदत करेल, अशी घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. या विधानानंतर चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अस्वस्थता वाढली आहे.
अफगाण-पाकिस्तानातशांततेची आशा नाही
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे मानवतावादी संकटाची भीती वाढली आहे. २६ फेब्रुवारीपासून पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ७५ नागरिक मारले गेले असून १.१५ लाख लोक विस्थापित झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये घरे, आरोग्य केंद्रे व नागरी पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले. अफगाण सैन्याची प्रत्युत्तराची कारवाई मर्यादित असली तरी, अफगाण सीमेवरून डागलेल्या मॉर्टरमुळे पाकिस्तानातील नागरिकही प्रभावित झाले. दोन्ही देशांनी सीमा व्यापार बंद केला असून, अफगाणिस्तानात अन्न, इंधन, औषधांचा पुरवठा धोक्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App