अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर बदलले political dynamics; पण शरद पवारांच्या चेल्यांना बदल पचवायला जातोय जड!!

Sunetra Pawar

नाशिक : अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर बदलले political dynamics; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना बदल पचवायला जातोय जड!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या काही दिवसांमधून समोर आली. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता 26 फेब्रुवारीला त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड सुद्धा होईल. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना मात्र अजूनही अजित पवारांच्या “सावलीतून” बाहेर पडायची इच्छाच होत नाही, म्हणून तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या घालून राष्ट्रवादीतले राजकारण बिघडवू पाहत आहेत. पण त्यांना अपेक्षित यश यायला तयार नाही. कारण आता शरद पवारांच्या किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या हातात खऱ्या अर्थाने राजकीय डावांचे पत्तेच उरलेले नाहीत.Sunetra Pawar changed the political dynamics, Sharad Pawar failed to digest it



– सत्य पचवणे जड

हे सगळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांच्या लक्षात आले आहे, पण त्यांना राजकीय सत्य पचवणे जड जाते आहे म्हणूनच जयंत पाटलांनी आम्ही सुनेत्रा पवार यांना मदत करू इच्छितो. त्यांनी आमची मदत जरूर घ्यावी. संकोच करू नये आम्हाला पार्थ पवार किंवा जय पवार यांच्या राजकीय मार्गात अडथळा आणायचा नाही असे सांगितले. पण पार्थ किंवा जय पवार यांच्या राजकीय मार्गात कुठला अडथळा आणण्याचे राजकीय सामर्थ्य जयंत पाटलांमध्ये किंवा त्यांच्या सध्याच्या नेत्यांमध्ये तरी उरले आहे काय??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर नकारार्थी आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या एवढा भक्कम पाठिंबा आहे, की त्यांच्या राजकीय मार्गात अडथळा आणण्याची बाकीच्या कुठल्या पक्षातल्या नेत्यांची क्षमताच उरलेली नाही. तो अगदी शरद पवारांचा सुद्धा “घास” उरलेला नाही.

– सुप्रिया सुळेंची हतबलता

जयंत पाटलांच्या आधी सुप्रिया सुळे यांच्या हे बदललेले political dynamics लक्षात आले, म्हणून तर त्यांनी दिल्लीत आता माझा दादाच नाही त्यामुळे दादाशी काय चर्चा झाली, याला काही अर्थ उरला नाही, अशी कबुली देऊन टाकली. या कबुलीतच सुप्रिया सुळे यांची राजकीय हतबलता दिसून आली. त्यांनी ज्या भावजयीच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक जिंकली, आज त्याच भावजयीच्या हातात महाराष्ट्रातल्या सत्तेची एक महत्त्वाची किल्ली आली आणि ती किल्ली त्या भावजयीच्या हातात येताना नणंद बाई आणि त्यांचे वडील म्हणजेच सुप्रिया सुळे आणि शरद पवार कोणताही विरोध करू शकले नाहीत. कारण त्यांच्या विरोधाचा कुठला उपयोग आणि परिणाम झाला नसता.

– भाजपच्याच हातात हुकमी एक्के

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे राजकीय पिल्लू सोडून सुद्धा काही उपयोग झाला नाही. कारण राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा शरद पवारांचा राजकीय “घास” उरलेला नाही. तो डाव कधीच भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या हातात निघून गेलाय. भाजपचे केंद्रीय नेते टाकतील, तेच पत्ते हुकमी एक्के असतील. बाकीचे सगळे चौकट राजे ठरतील. शशिकांत शिंदे यांच्या हे फार उशिरा लक्षात आले पण ते लक्षात आल्यानेच त्यांनी स्वतःहून विलीनीकरणाचा विषय थांबवून टाकला.

– अमोल कोल्हेंची कबुली

अमोल कोल्हे यांनी तर अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर सगळे political dynamics बदलून गेल्याची त्याच शब्दांमध्ये कबुली दिली. कारण political dynamics बदलले हे शब्द त्यांनीच मुलाखतीमध्ये वापरले. वास्तविक हे political dynamics त्याच दिवशी बदलले, ज्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा हात धरून “पुढाकार” घेतला होता. सुप्रिया सुळे यांचा “पुढाकार” भाजपच्या नेतृत्वाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेतृत्वाला खटकला आणि तिथेच सगळे political dynamics बदलायचा निर्णय झाला. तो निर्णय झपाट्याने अंमलात आणण्यात आला. राजकीय गाडी फार वेगाने पुढे नेण्यात आली. तिला कुठलाही स्पीड ब्रेकर लागलाच नाही, कारण तसा स्पीड ब्रेकर लावण्याची किंवा आणण्याची कुणाची क्षमताच उरलेली नाही.

– राजकीय लुडबुडीला नाही वाव

फक्त हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या उशिरा लक्षात आले आणि राजकीय सत्य पचविणे त्यांना जड गेले. आता इथून पुढे भाजपचे नेतृत्व जसे बोलेल, तसेच सुनेत्रा पवार वागतील किंबहुना त्यांना वागावे लागेल. सर्व राजकीय मर्यादा पाळून स्वतःचे नेतृत्व विकसित करावे लागेल. ते नेतृत्व विकसित करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी अडथळे आणले, तर भाजपचे नेते ते अडथळे परस्पर दूर करतील. सुनेत्रा पवारांचे नेतृत्व वाचवतील, पण ते विशिष्ट मर्यादेच्या पेक्षा मोठे होऊ देणार नाहीत. अजित पवारांचा परिवार सोडून बाकी कुठल्या नेत्यांना फारशी “राजकीय लुडबुड” करायला वाव ठेवला जाणार नाही. बाकी संजय राऊतांच्या स्टाईलने रोहित पवारांच्या पत्रकार परिषदा सुरू राहू शकतील, पण त्याचा प्रत्यक्ष राजकारणावर परिणाम “शून्य” असेल.

Sunetra Pawar changed the political dynamics, Sharad Pawar failed to digest it

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात