विशेष प्रतिनिधी
पोहरादेवी, (वाशीम) : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बंजारा समाजातील मान्यवरांना ‘सेवा पुरस्कार’ देऊन आज गौरविले.Dignitaries from the Banjara community were felicitated with service awards by Deputy Chief Minister Eknath Shinde.
बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल असा विश्वास याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतींनाही यावेळी अभिवादन केले. देशभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बंजारा समाजाचे स्वागत केले. समाजाची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
– अध्यात्मिक पर्यटन केंद्र
पोहरादेवी ही संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे आल्यावर वेगळी आध्यात्मिक ऊर्जा मिळते असे अधोरेखित करत हा संपूर्ण परिसर मोठे आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे देखील याप्रसंगी स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना या विकास आराखड्यास ७२४ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची आठवण करून देत संत सेवालाल महाराज स्मारकासह सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते येथे विरासत संग्रहालयाचे उद्घाटन झाल्याचाही उल्लेख करत हे स्मारक भविष्यात समाजाला आणि कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
बंजारा समाज हा निसर्गपूजक, मातीशी इमान राखणारा आणि राष्ट्रभक्त समाज असून इतिहासात या समाजाने देव, देश आणि धर्मासाठी बलिदान दिले आहे असे नमूद करून अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि एकजुटीने लढणारा समाज म्हणून बंजारा समाजाची ओळख असल्याचे कौतुकोद्गार याप्रसंगी काढले.
यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, खासदार संजय देशमुख, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायजिंग महाराज, गोपाल महाराज यांच्यासह बंजारा समाजातील मान्यवर, पदाधिकारी, शिवसैनिक आणि संत सेवालाल भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App